उंदरांसाठीचे चिकटसापळे स्थलांतरित पक्ष्यांच्या मुळावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2019
Total Views |


 


 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - उंदारांसाठी लावण्यात आलेले चिकट सापळे इतर जिवांसाठी घातक ठरत आहेत. पूर्व युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करुन स्थलांतरित झालेला 'रेड-थ्रोटेड फ्लायकॅचर' (लाल-कंठाचा माशीमार) हा पक्षी मंगळवारी लोणावळ्यात चिकट सापळ्यात अडकलेला आढळला. प्रसंगी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) सहाय्यक संचालक डाॅ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याची सुटका करुन त्याला जीवदान दिले.

 

हिवाळ्याच्या तोडांवर महाराष्ट्रात दूरदेशीच्या पक्ष्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मुंबईच्या पाणथळीवर झाल्याचे दिसून येते आहे. यामध्ये पूर्व युरोप व मध्य आशिया खंडात प्रजनन करुन हजारो किमीचा प्रवास करुन हिवाळ्यात दक्षिण आशियात स्थलांतर करणाऱ्या 'लाल-कंठाचा माशीमार' पक्षीही आढळून येत आहे. मात्र, यातील एक पक्षी लोणावळ्यातील गावात उंदारांसाठी लावण्यात आलेल्या चिकट सापळ्यात अडकल्याचे आढळून आले. 'बीएनएचएस'च्या 'निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्रा'चे सहाय्यक संचालक डाॅ. राजू कसंबेंनी या पक्ष्याची सापळ्यातून सुखरुपरित्या सुटका केली आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

 

 
 
 

मंगळवारी लोणावळ्यात हा पक्षी आढळल्यानंतर कसंबे या पक्ष्याला सापळ्यासकट मुंबईला घेऊन आले. पशुवैद्यकाचे शिक्षण घेत असलेल्या त्यांचा मुलगा वेदांत कसंबेेेने सुर्यफुलाच्या तेलाच्या मदतीने या पक्ष्याची सापळ्यामधून सुटका केली. त्याच्या शरीरावर चिकटलेला चिकट स्त्राव काळजीपूर्वक स्वच्छ केला आणि त्याला सोडून दिले. दरम्यान सापळ्यातून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात या पक्ष्याने आपली शेपटी गमावल्याचे राजू कसंबे यांनी सांगितले. या सापळ्यावर उंदीर चिकटल्यानंतर त्यांना खाण्यासाठी येणाऱ्या घुबड, ठिपकेवाला घुबड, शिकरा या पक्ष्यांसाठी सुद्धा घातक असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वापर झाल्यावर या सापळ्यांची योग्यप्रकारे व्हिलेवाट लावणे आवश्यक असल्याचे, ते म्हणाले. कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्था उंदारांना पकडण्यासाठी चिकट सापळे वापरण्याचा सल्ला देतात. मात्र, त्यामध्ये अनेक वेळा उंदराबरोबरच त्याचे भक्षण करण्यासाठी आलेले साप किंवा सापळ्यावर टाकलेले खाद्य खाण्यासाठी आलेले पक्षी देखील चिकटले जातात. २००१ मध्ये साली 'केंद्रीय अॅनिमल वेल्फेअर बोर्डा'ने अशा चिकट सापळ्यावर बंदी आणली होती. तरीही कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्था अशा प्रकारचे सापळे ग्राहकांना उपलब्ध करुन देतात.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@