मनोरूग्णांचा देवदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |





मनोरूग्णांसाठी अथक काम करून हक्काचा आधार देणार्‍या अ
‍ॅड. आकाश आभाळे यांच्या कामाविषयी जाणून घेऊया



समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणार्‍या अनेक व्यक्ती आहेत
. गरीब, निराधार लोकांना समाजात जगण्यासाठी नवी दिशा देण्याचे चांगले काम या व्यक्ती करत असतात. आपल्या ताटातला घास दुसर्‍याला देऊन त्यांना जगण्याचा हक्क मिळवून देणार्‍यांसाठी अ‍ॅड. विनायक आभाळे हे आदर्श आहेत. या वयात मित्रांसोबत मौजमजा न करता रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी काम करण्याचा वसा विनायक यांनी हाती घेतला आहे. कल्याणमधील आंबिवली गावात राहणारे विनायक आभाळे यांच्या घरी आईवडील आणि दोन बहिणी. लहानपणी अत्यंत गरिबी असल्याने अनेक कामे करत विनायक यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची जिद्द असल्याने कोणत्याही अडचणीत ते डगमगले नाहीत. त्यांनी आपली १० वी कशीबशी पूर्ण केली. त्यानंतर वकिली करण्याचे ठरविल्याने अजून कष्ट करण्यास सुरुवात केली.



के
. डी. एम. सी.मध्ये त्यांनी कंडक्टर म्हणूनदेखील नोकरी केली. मात्र, तिथेही शिक्षण पूर्ण करताना त्यांना अडचणी येत असल्याने ती नोकरी सोडावी लागली. कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण, ही वेळ त्यांच्यासाठी सोयीची होती. सकाळी कॉलेज आणि रात्री २ नंतर काम असा प्रवास चालू होता. अखेरीस त्यांनी आपल्या संघर्षातून वकिली पूर्ण केली. रस्त्यावरील निराधार, आजारी मनोरुग्ण बघून विनायक यांनी अशा लोकांसाठी काम करण्याचे ठरविले. साहजिकच हा मार्ग काही सोपा नव्हता. यात अनेक अडचणी होत्या. मात्र तरीही विनायक यांनी आपले काम सुरूच ठेवले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रस्त्यावरील एका आजारी मनोरुग्णाला मदत केली. या रुग्णाच्या पायाला जखम होऊन त्यात किडे पडले होते. त्याच अवस्थेत तो अनेक दिवस पडून होता. विनायक यांनी त्या व्यक्तीला स्वतः वैद्यकीय मदत केली. त्याची जखम स्वतः साफ करून त्यावर औषध लावले. त्याला कोणतेही रुग्णालय भरती करण्यास तयार नसल्याने विनायक यांनीच त्याची सेवा केली आणि त्याला बरे केले. यानंतर मात्र त्यांचे काम थांबले नाही. हे काम करताना अनेक लोकांनी अडचणी निर्माण केल्या.



मदत करणे तर दूर मात्र चांगल्या कामात व्यत्यय अनेकांनी आणला
. हे काम करत असताना झपाटल्यासारखे त्यांचे हे कार्य चालू आहे. कुठल्या भागातून निराधार रुग्णांच्या मदतीसाठी फोन येईल, हे सांगता येत नाही त्यामुळे व्यवसायाव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना विनायक जात नाहीत. त्यांच्या या कार्याची दखल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि अनेक सामाजिक व्यक्तींनी घेतली आहे. त्यांच्या आधार सामाजिक संस्थेला अनेकांनी मदत केली आहे. यात शिवसेना नेते रवी पाटील यांनी रुग्णांना मदत करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यांच्या संस्थेमार्फत एका बेघर मनोरुग्णाची २५ वर्षांनंतर परिवाराशी भेट घडवून आणली. कल्याण येथील जागरूक नागरिक सचिन शिर्के यांच्याकडून बैल बाजार येथे मनोरुग्ण व्यक्ती रस्त्यावर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ विनायक यांनी त्या मनोरुग्णाला भेटून त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळवली. परंतु, ही मनोरुग्ण व्यक्ती अपुरी आणि विसंगत माहिती सांगत असल्याने नातेवाईकाचा शोध घेणे कठीण होत होते. मात्र, त्या व्यक्तीच्या बोलण्यात सतत छत्तीसगढ- विलासपूर असा वारंवार उल्लेख येत होता.



त्यानंतर आभाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी
छत्तीसगढ-विलासपूर पोलीस स्थानकात मनोरुग्णाची माहिती पाठवली. त्यावरून छत्तीसगढ पोलिसांचा तपास चालू होऊन सलीम जलाल शेख असे या रुग्णाचे नाव असल्याचे कळले. अथक प्रयत्नांनंतर छत्तीसगढमधील त्या रुग्णाच्या नातेवाईकांना आपला भाऊ जिवंत समोर बघायला मिळाला. असे अनेक किस्से विनायक यांनी सांगितले. महिला मनोरुग्णांचे पुनर्वसन खूप कठीण असते. कारण, त्यांना त्यांचा परिवार पुन्हा घरात घेण्यास तयार नसतो. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एक २२ वर्षीय तरुणीला रस्त्यावरून विनायक यांनी रुग्णालयात आणले आहे. तिची अवस्था अत्यंत खराब असूनही ती घरी जाण्यास तयार नाही, त्यामुळे तिचा सांभाळ आता संस्थेकडूनच केला जाणार आहे. अशा अनेक निराधार व्यक्तींना ही संस्था आज आनंदाने सांभाळतेय. विनायक यांना अजून खूप काम करायचे आहे. त्यांनी स्वखर्चाने सर्व रुग्णांना सांभाळले आहे. या निराधार रुग्णांसाठी विनायकच त्यांचे नातेवाईक आणि सर्व काही आहेत. विनायक यांना आपल्या संस्थेचा आवाका वाढवायचा असून त्या दिशेने त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांचा हा माणुसकीचा हात गरजू लोकांपर्यंत पोहोचावा, हिच दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!



-कविता भोसले
@@AUTHORINFO_V1@@