पीएमसी प्रकरणात सरकारची बाजू मांडणार 'हे' वकील [वाचा सविस्तर]

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |

 

अॅड. मिसर करणार युक्तिवाद;
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

 


नाशिक, दि. २२ (प्रतिनिधी): सध्या देशभरात गाजत असलेल्या पंजाब महाराष्ट्र को . ऑप बँक अर्थात पीएमसी घोटाळा प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवुन या कामी जलदगतीने ठेवीदारांना दिलासा मिळावा , घोटाळा कर्त्यांच्या मिळकतींची तातडीने जप्ती व्हावी . तसेच सदर प्रकरणात तपासात कोणत्याही प्रकरच्या उणिवा राहु नये याकरीता मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालावरुन महाराष्ट्र शासनाने नाशिक येथील अॅड. अजय मिसर यांची तातडीने विशेष सरकारी वकील म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


अॅड . अजय मिसर यांनी यापूर्वी देखील सीबीआयचे गुंतागुंतीचे खटल्यांमध्ये यशस्वतीरित्या काम केलेले आहे. त्यांनी सन २००८ मालेगांव बॉम्बस्फोट, छोटा शकील, पाकमोडीया स्ट्रीट कासकर म . को . का . खटला , साकीब नाचीन खटला , शाहीद आझमी खुन खटला , इकबाल कासकर म . को . का . खटला , लष्कर - ए - तैयब्चा चे खटले , २६ / ११मधील अबु जिंदाल हिमायत बेग , शेख लाल बाबा , नांदेड येथील ईसीस संघटनेचा खटला , औरंगाबाद येथील वर्धन खुन खटला . मुंबई येथील मनोज पांडे खून खटला तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे संवेदनशील खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणुन शासनाचे वतीने काम बघितले आहे . त्यांचा अनुभव बघता याकामी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


पंजाब व महाराष्ट्र को . ऑप . बँक लिमिटेड मल्टिस्टेट शेडुल्ड बँक यांचे तर्फे वसुली अधिकारी जसबीर सिंग मटटा यांचे फिर्यादीवरुन प्रथम भांडुप पोलीस स्टेशन मुंबई येथे भा . दं . वि . क . ४०९ , ४२० , ४६५ , ४६७ , ४७१ , १२० ब अन्यये दिनांक ३० / ०९ / २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाची व्याप्ती व घोटयाळयाची रक्कम बघता सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांचेकडे वर्ग करण्यात आला. फिर्यादीनुसार संबंधित घोटाळा हा रक्कम रु . ४३५५ . ४६ कोटी इतक्या रकमेचा आहे . बँकेचे मॅनेजींग डायरेक्टर व इतर बोर्ड मेंबर तसेच बीएचआयएल कंपनीचे पदाधिकारी आरोपी आहेत. प्रथमदर्शनी डीएचआयएल कंपनीच्या एकुण ११ संलग्न कंपन्यांचा सदर गुन्हयात संबंध दिसुन येत आहे. याकामी बँकेचे ९.१२ लाख ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी मिळुन आले आहे . बँक बंद झाल्यामुळे ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे . प्रकृती अस्वास्थ्य , दबाव व पैशांअभावी काही ठेवीदारांनी आत्महत्या केल्या त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली असून तपासाकामी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे . तसेच , तपासात संगणक तज्ञ . बँकेचे तज्ञ , रिझर्व बँकेचे प्रतिनिधी आदींचा चा समावेश करण्यात आलेला आहे .


तपासात त्रुटी राहु नये , आरोपींना फायदा मिळु नये तसेच आरोपींचा मिळकती तातडीने जप्त व्हाव्या हया हेतुने शासनाने अॅड . अजय मिसर यांची याकामी विशेष सरकारी वकील म्हणुन नेमणुक केली आहे . मुंबई येथील मेटोपोलीटियन्ट मॅजीस्ट्रेट व विशेष न्यायालयासमोर सदर प्रकरणाचे कामकाज चालणार आहे. सदरचा गुन्हा हा विचारपुर्वक व चलाखीने केला गेला आहे . याकामी एनफोर्समेंट डायरेक्टरेट यांनी देखील दखल घेतली असुन त्याबाबत सखोल चौकशी चालु आहे. तपास व तपासी पथक याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे . यात काही आरोपींना अटक झाली असुन काही संशयित अदयाप फरार आहेत . सर्व स्तरावर त्यांचा शोध घेतला जात आहे . तपास प्रगतीपथावर असुन वरिष्ठ पोलीस अधिकारी व ईडीचे अधिकारी तपासावर सातत्याने देखरेख करीत आहे . सदर घोटाळयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे .
@@AUTHORINFO_V1@@