कोळसे पाटीलांचे व्याख्यान रद्द, फर्ग्युसनमध्ये वाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
पुणे : माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे व्याख्यान होणार होते. संस्थेने परवानगी नाकारली असली तरी व्याख्यान घेण्यावर काही विद्यार्थी ठाम आहेत. तर काहींनी या व्याख्यानाला विरोध केला आहे. यावरून फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशात पोलीस कॉलेजच्या आवारात उपस्थित आहेत.
 

न्या.बी.जी कोळसे पाटील कॉलेजमध्ये दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणा बाजी केली. विद्यार्थ्यांच्या एका गटाने कोळसे पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तर विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाकडून त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही वेळासाठी कॉलेजच्या आवारात गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांना समोरासमोर येण्यापासून रोखले.

 
 

 
 

सोमवारी फर्ग्युसन कॉलेजमध्ये दुपारी १२ वाजता न्या. बी.जी कोळसे पाटील यांचे व्याख्यान होणार होते. भारताची राज्यघटना १९५० ते २०१८ या विषयावर ते व्याख्यान देणार होते. शनिवारी अचानक या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. परिणामी, न्या. बी.जी कोळसे पाटील यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातच व्याख्यान दिले.

 

का नाकारली परवानगी?

 

फर्ग्युसन कॉलेज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून चालविले जाते. त्यामुळे फर्ग्युसन कॉलोजमधील कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्याचे अधिकार हे फक्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला आहेत. फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांना हे अधिकार नाहीत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य यांच्यातील विसंवादामुळे न्या. बी.जी कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आली. अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@