पुणेरी मेट्रो तीन डब्यांची स्वदेशी ट्रेन पुण्यात दाखल

‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे.

    05-Jun-2024
Total Views |

puneri metro


पुणे, दि.५ :
हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविण्यासाठी आता ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे.

'अलस्टॉम’ या प्रसिद्ध कंपनीने आपल्या आंध्र प्रदेश श्रीसिटी येथील कारखान्यात तयार केलेली तीन डब्यांची पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे. पहिली पुणेरी मेट्रो ट्रेन रविवारी (ता. २) पुणे मेट्रो लाईन ३ च्या माण येथील डेपोत दाखल होणार असल्याची माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे देण्यात आली. या कामाचे कंत्राट टाटा समूहाला देण्यात आले आहे. टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी ८५ किलोमीटर इतक्या अधिकतम वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला या प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी ८५ किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.