कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुकमध्ये नोंद

    17-Jan-2019
Total Views | 33
 

मुंबई : लोकसहभागातून आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने सुरू केलेल्या कांदळवन स्वच्छतेची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात येणार आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने वन विभागाच्या तीन कार्यक्रमांची दखल घेत त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली. २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख वृक्षलागवड, त्यानंतर पुन्हा ४ कोटी वृक्ष लागवड उपक्रमाची आणि २०१७मध्ये पावसाळ्यात ५ कोटी ४३ लाख वृक्षलागवड या लक्षवेधी कामगिरीची दुसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. आता फेब्रुवारी २०१९ मध्ये या कांदळवन स्वच्छतेची नोंद झाल्याचे वनविभागाला मिळणार आहे.

 

२५ हजार जणांनी उचलला ८ हजार टन कचरा

 

कांदळवन कक्षाने स्वच्छ कांदळवन अभियानाची अंमलबजावणी २०१५ मध्ये सुरू केली. या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई, बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी, अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ११.०३ कि.मी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. २५ हजार लोकांनी यात सहभाग घेतला आणि शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतातील सर्वात मोठे पाऊल या निमित्ताने पडले. वन विभागाच्या कामाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने अशा पद्धतीने तिसऱ्यांदा नोंद घेतल्याने विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 
 
 
 

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच पण हे शहर जगातील मोठे कांदळवन क्षेत्र असलेले शहर आहे. या कांदळवनात प्लास्टिक आणि कचरा साठल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत होता हे लक्षात घेऊन प्रामुख्याने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. याचा लाभ मच्छिमार बांधवांनाही झाला. कांदळवन कक्ष, लोकसहभाग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. कांदळवन कक्षाबरोबर सामान्य मुंबईकर, स्वयंसेवी संस्था यांची यातील कामगिरी फार मोलाची आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

 

...असं आहे महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्र

 

भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ.कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ.कि.मी. ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात आहे. कांदळवन क्षेत्रात अशी भरीव वाढ करणारं महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121