दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; एकाच मृत्यू

    12-Oct-2018
Total Views | 26



मुंबई : दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये मनोज मौर्य या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दादर पश्चिम परिसरातील फुल मार्केटमध्ये सकाळी च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. दादर फूल मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठे फुल मार्केट आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने याठिकाणी फुल खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. याचाच फायदा घेऊन मारेकऱ्यांनी मनोज मौर्य याच्यावर हल्ला केला.

 

मनोज मौर्य हा या मार्केटमध्ये वजन काटे पुरविण्याचे काम करायचा अशी माहिती स्थानिकांनी दिली. हल्ला झाला त्यावेळी मौर्य कामात व्यस्त होता. त्याचवेळी हल्लेखोर मौर्य याच्या दिशेने दुचाकीवरून आले आणि मौर्यवर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून हल्लेखोर कोण होते? मौर्यवर हल्ला करण्याचं कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121