sector

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष

Read More

कामगार आहे, तळपती तलवार आहे! प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडले सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन

कामगार आहे, तळपती तलवार आहे, सारास्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे, असं म्हणत कामगारांच्या वेदनेला शब्दबद्ध करणारे महाकवी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा जागार व्हावा यासाठी सुर्वे मास्तरांचे एक दिवसीय साहित्य संमेलन पार पडले. स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन दि. २७ मार्च रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडले. या एक दिवसीय साहित्य संमेलनात काव्यवाचन, परिसंवाद, एकांकिका सादरीकरण या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण

Read More

रेल्वेत पहिल्यांदाच भरणार मराठी साहित्ययात्री संमेलन!

नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे या संकल्पनेतून ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे. साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड

Read More

मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

(Raj Thackeray)फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. पुण्यातील टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडला. यावर्षी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेतर्फे संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेत

Read More

थोर संतकवी श्रीधर यांचा रामविजय (पूर्वार्ध)

रघुकुलतिलक श्रीरामाचे सकल मराठी संतांनी गुणसंकीर्तन केले असले, तरी श्रीरामकथेवर मराठीत स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे पहिले संत एकनाथ आहेत. त्यानंतर समर्थ रामदासस्वामी आणि तिसरे संतकवी श्रीधर (नाझरेकर) आहेत. संतकवी श्रीधर यांनी १७०३ साली श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ‘रामविजय’ लिहिला. ४० अध्यायी ९ हजार, १४७ ओव्यांचा ‘रामविजय’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भाविकातील सर्वाधिक लोकप्रिय पारायण ग्रंथ आहे. ‘रामविजय’ एवढी अफाट स्वीकृती लोकप्रियता महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ग्रंथास लाभलेली नाही. आजही गावांगावांमध्ये ‘रामायण’ पारायण

Read More

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध : नीलम गोऱ्हे

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का?' याविषयावर आगळेवेगळे अभिरूप न्यायालय पार पडले. अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी का

Read More

भक्ती प्रेमबोधाचा प्रभावी, रसाळ प्रवक्ता वै. हभप बाबामहाराज सातारकर

महाराष्ट्राची सत्वधारा असलेल्या वारकरी संप्रदायाचे भूषण, अध्वर्यू हभप बाबामहाराज सातारकर हे विठ्ठल भक्ती व प्रेमबोधाचे अत्यंत रसाळ आणि तेवढेच प्रभावी प्रवक्ते होते. निरूपणकार म्हणून ते ख्यातकीर्त होते. त्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तन कलेचा पूर्णावतार होता. ज्ञान, भक्ती, प्रेम आणि बोध यांचा अपूर्व प्रयाग संगम होता. त्यांनी अविरतपणे ६० वर्षे सातारकर फडाची धुरा सांभाळत, पंढरीच्या पायी वारीत प्रेमबोधाचे अमृतसिंचन केले. पू. बाबामहाराजांचा निकटचा सहवास आणि संवादसुखाचा भाग्ययोग लाभलेले, संतसाहित्याचे उपासक-अभ्यासक वि

Read More

वसईच्या 'साहित्य जल्लोषा'त काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचा जल्लोष!

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Read More

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे

मुंबई : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले असून अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या संमेलनाच्या तारखासुध्दा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अमळनेर येथे दुसऱ्यांदा संमेलन भरणार असून २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हे संमेलन असणार आहे, असे साहित्य महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ साहित

Read More

“पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज

डोंबिवली : “ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजांपेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळींचे काम प्रेरणा देणारे आहे, विचारांना दिशा देणारे काम आहे, ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला कृतीत आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त

Read More

सांस्कृतिक दहशतवादावर मराठी मुस्लीम साहित्यिक मोकळेपणाने बोलू शकतील?

दि. २८-२९ जानेवारीला नाशिकला अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक सरकारमान्य विद्वान आणि साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाच्या दोन दिवसांत पाच परिसंवाद होणार आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘मुस्लीम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि दुसरा ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर होणार आहे. हे दोन्ही परिसंवाद हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तरीही या परिसंवादात पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यांना ‘उजवे विचारवंत’- 'A

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121