महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read More
दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घट झाली असून एमसीएक्सवर सोने ७८,३५७ रुपयांच्या आसपास आला आहे. तर चांदीचे भाव ९४,२०६ रुपयांवर आले आहे. सकाळच्या सुरूवातीस एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क १८१ रुपयांच्या घसरणीसह ९४,१०३ रुपयांवर उघडला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती.
राज्यात टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो दरात मोठी घट झाली असून ४०-५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून खनिजांवरील एक्साईज ड्युटी कमी केली असून त्याचाच परिणाम म्हणून इंधन दरासह खनिजांच्या किंमतीदेखीत कमी झाल्या आहेत.
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
सण-उत्सवांची सुरुवात झाली असून बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे. आज विजयादशमी असून यादिवशी सोनं खरेदी करण्याचा मान आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. आजचे मुंबईतील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. Gold price
इस्रायलवर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर उफाळलेल्या संघर्षात तेलाचे दर कडाडले आहेत. इस्रायलने हे युद्धच असल्याचे जाहीर करत ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टी अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. ‘हमास’ला मदत करणार्या इराणपर्यंत या संघर्षाची व्याप्ती वाढली, तर मात्र पुरवठ्याअभावी संपूर्ण जगाला इंधनाची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईकरांना टोल भरताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. टोलदरात वाढ करण्यात आली असून मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवर टोल वाढ लागू करण्यात आली आहे. या टोल वाढीमुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या वाढीव दरामुळे मुंबईत प्रवेश करणे आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांना टोल भरताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी कपात झाली असून सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी कमी झाले आहेत. ही नागपुरकरांसाठी मोठी खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. नागपुरमध्ये १५ ऑगस्टच्या रात्रीपासून सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.
कडकडून तापलेल्या तव्यावर पाणी ओतले की जशी होणारी आग कमी व्हायला लागते, तशीच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या महागाईने पोळून निघालेल्या सामान्य जनतेच्या दुःखावर दिलासादायक फुंकर घालणारी बातमी आली आहे
देशातील वाढत्या महागाईवर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरांत वाढच केली आहे. सलग तिसऱ्या तिमाहीतही रिझर्व्ह बँकेकडून आपल्या धोरणात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही
वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या व्यावसायिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्वयंपाकचा गॅसच्या किमतीत ०१ जून पासून एक मोठा बदल करण्यात आला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीचे दर सातत्याने वाढतच आहेत.सोन्याच्या दरांनी ५० हजारांची पातळी ओलांडली आहे
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दहाव्यांदा व्याजदरात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफि इंडियानं आपल्या व्याजदरांमध्ये बदल केला. यासह प्रमुख बँकांपैकी एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आदींनीही व्याजदरात बदल केले.
आर्थिक व्यवहार आणि ठेवींसाठी पतपेढ्या कितपत सुरक्षित, हा प्रश्न ठेवीदारांना बरेचदा भेडसावत असतो. पण, हल्ली जिथे राष्ट्रीयकृत बँकांपासून ते सहकारी बँकाही बुडीत निघतात, तिथे तर पतपेढ्यांची काय स्थिती म्हणा! म्हणूनच पतपेढ्यांमध्ये ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करावी का? केलीच तर किती करावी? पतपेढ्यांचा कारभार कसा चालतो? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख...
नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाचे मालक आणि मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सात दिवसांसाठी 53 रूपयांत बेड सेवा देत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये 5 बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे.
सध्या कोविड महामारीमुळे रुग्णांची रुग्णवाहिकेसाठी परवड होताना दिसून येते. काही वेळा तर रुग्णवाहिकेसाठी अतिरिक्त दर आकारले जात असल्याच्या तक्रारी ही रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत असतात. मिलिंद चव्हाण विचारमंच आणि चव्हाण प्रतिष्ठानतर्फे माफक दरात ‘कार्डिऍक ऍब्युलन्स’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत या कार्डिऍक ऍब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
सर्वसामान्य माणसे सुरक्षिततेसाठी, भविष्यासाठी आपली किडूकमिडूक बँकेत जमा करतात, त्या सामान्य बँक ग्राहकांचा थकीत/बुडित कर्जांचे प्रमाण प्रचंड असावे, हा विश्वासघात आहे. बऱ्याच नव्या ‘स्टार्टअप्स’ युनिट बँकेकडून कर्जे घेण्यापेक्षा ‘व्हेंचर कॅपिटल’ घेतात, याचाही परिणाम बँकांच्या कर्जांवर झाला. मोठे उद्योगगृह परकीय चलनातही कर्जे मिळू शकतात. ही कर्जे कमी व्याजदराने मिळतात, ही सर्व बँकांपुढील आव्हाने आहेत.
राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर आता कमी केले असल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना चाचणीची किंमत आता जवळपास २८० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे अत्यावश्यक आहे. व या अनुषंगाने सदर निर्णय निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल.
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी बँकांचे कर्जावरील व्याजदर कमी करण्यात येत आहेत. कर्जावरील व्याजदर कमी केल्यामुळे बँकांना ठेवींवरील व्याजदरदेखील कमी करावे लागले. गुंतवणूकदारही त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात होते. यावर उपाय म्हणून कमी होत असलेल्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ‘फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड’ विक्रीस काढले आहेत.
रिलायन्स जिओच्या या प्लॅन्समध्ये सुमारे ४०% दरवाढ
कांदा आयात करण्याचा केंद्राचा निर्णय
१ डिसेंबरपासून हे नवीन इंटरनेट दर लागू होतील.
यंदाच्या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने 'एमसीएलआर'मध्ये केलेली ही पाचवी दरकपात
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पीएफवरील व्याजदरात १० बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे.
भारताने चोहोबाजूंनी आर्थिक नाड्या आवळ्यानंतर आता पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. आधीच आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान बिकट अवस्थेत सापडला आहे. रोजच्या खर्चासाठी पैसाच शिल्लक नसल्याने जनतेच्या समस्या वाढत चालल्या आहेत. पाकिस्तानचा महागाई दर गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. मार्चमध्ये तो ९.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बॅंकेनेही व्याजदरात वाढ केली असून व्याजदर १०.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
केंद्र सरकार पीएफच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीएफचा सध्याचा असलेला ८.५५ टक्के व्याजदर कायम राहणार असून देशातील सहा कोटी पीएफधारकांना याचा फायदा होणार आहे.
खासगी क्षेत्रातील बिगर बॅंकींग वित्तीय संस्था असलेल्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात वाढ केली असून रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) संस्थेने ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे.
करापोटी येणारा प्रत्येक पैसा, भ्रष्टाचार न करता विकासाच्या कामी लावायचा आणि मिळणार्या प्रत्येक सेवेचा मोफत लाभ न घेता, त्यासाठी किमान काही शुल्क भरण्यासाठी नागरिकांना तयार करायचे, अशा दुहेरी उद्देशाने मोदी सरकार वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.
फिच ’ या जागतिक मानांकन संस्थेने २०१८-१९ या वर्षी भारताचा विकासदर ७.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. .
केंद्र सरकारने छोट्या गुंतवणूकदारांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या तिमाहीतील म्हणजेत १ आक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.