टोमॅटोच्या दरात गेल्या काही दिवसात चढ-उतार, ४०-५० रुपये प्रतिकिलो दराने बाजारात!
07-Aug-2024
Total Views | 32
मुंबई : राज्यात टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो दरात मोठी घट झाली असून ४०-५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे. दरम्यान, टोमॅटो १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस होता. त्यानंतर आता भाव उतरल्याचे बाजारात चित्र दिसून येत आहे. टोमॅटो दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील व्हेज थाळीदेखील महाग झाली होती.
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे भाजीपाला दरात वाढ दिसून येते. त्यातच आता कित्येक दिवसांनी त्यात घट झाल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. चढ्या दरात अचानक घट झाल्यानंतर गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा एकदा दर कमी होतील, असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे टोमॅटोसोबत कांदा आणि बटाट्याच्या दरातही वाढ झाली. गेल्या महिन्यात कांदा आणि बटाट्याच्या दरातही अनुक्रमे २० आणि १६ टक्के वाढ दिसून आली आहे. याचे कारण म्हणजे रब्बी हंगामात उत्पादन कमी झाल्याने कांद्याच्या किमतीवर परिणाम झाला असून खराब वातावरणाचा फटका बटाट्याच्या उत्पादनाला बसला आहे.
मांसाहारी थाळीच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ
गेल्या महिन्यात मांसाहारी थाळीच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यात थाळीची किंमत ५८ रुपयांवरून थेट ६१.४ रुपये इतकी वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तथापि, ब्रॉयलरच्या किमती स्थिर राहिल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत ९ टक्क्यांनी घट झाली आहे. एकंदरीत, भाज्यांच्या (टोमॅटो आणि कांदा) भाववाढीचा परिणाम मांसाहारी थाळीच्या किमतीवरही झाला आहे.