आनंदाची बातमी, आता गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त!

    01-Jun-2022
Total Views | 72
 
 

LPG Cylinder 
 
 
 
नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या व्यावसायिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्वयंपाकचा गॅसच्या किमतीत ०१ जून पासून एक मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची, १९ किलो वजनाच्या सिलिंडरांची किंमत प्रति सिलेंडर १३५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात येणार आहे. या बदलानंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २,२१९ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी हे सिलेंडर २,३५४ रुपयांना मिळत होते.
  
याप्रमाणे कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,४५४ रुपयांवरून २,३२२ रुपयांवर, मुंबईत २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० रुपयांवर आणि चेन्नईमध्ये २,३७३ रुपयांवरून २,५०७ रुपयांवर आली आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळणार आहे. याआधीही १९ मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121