एचडीएफसीचे गृहकर्ज महागले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |
 
 
 

मुंबई : खागी क्षेत्रातील बिगर बॅंकींग वित्तीय संस्था असलेल्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात वाढ केली असून रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) संस्थेने ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे.

 

नवे व्याजदर १ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. कंपनीकडून तीस लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आता ८.९५ टक्के दराने उपलब्ध होणार आहे. दरम्यान महिलांसाठी ८.९० टक्के हा व्याजदर असणार आहे. त्याचप्रमाणे ३० ते ७५ लाखांदरम्यानच्या गृहकर्जासाठी व्याजदर आता .१० टक्के व्याजदर असणार आहे. तर महिलांसाठी .०५ टक्के एवढा असेल, अशी माहिती एचडीएफसीकडून जाहीर करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@