पीएफधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

    18-Feb-2019
Total Views | 30

 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकार पीएफच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, पीएफचा सध्याचा असलेला ८.५५ टक्के व्याजदर कायम राहणार असून देशातील सहा कोटी पीएफधारकांना याचा फायदा होणार आहे.

 

केंद्रीय मंडळ समितीत केंद्र सरकार, कर्मचारी आणि श्रम मंत्रालय आदी संघटनांचे प्रमुखांचा सामावेश असणाऱ्या केंद्रीय मंडळाची गुरुवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईपीएफओमधील निर्णय घेणाऱ्या या समितीच्या बैठकीत पीएफ धारकांची किमान पेन्शनवर चर्चा होणार आहे. या बैठकीत किमान पेन्शन दुप्पट केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अंदाजानुसार निर्णय ठरल्यास ईपीएफओच्या ५० लाख खातेधारकांना याचा फायदा होणार आहे.

 

गुरुवारी केंद्रीय मंडळ सदस्यांच्या बैठकीपूर्वी वित्त, गुंतवणूक व लेखापाल समितीची (एफआयएसी) बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफच्या व्याजदरांवर निर्णय घेण्यात येईल. दरम्यान व्याजदरांमध्ये बदल न करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121