पीएफवरील व्याज दरात घट

    17-Jul-2019
Total Views | 37


 


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पीएफवरील व्याजदरात १० बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे.

 

हे नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.

 

याफंडांच्या व्याजदरात कपात

· जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्व्हिसेस)

· कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया)

· स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड

· इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड

· इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड

· जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस)

· डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड

· आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड

· इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121