आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किमती सुस्तावल्या; जाणून घ्या आजचा भाव

    05-Nov-2024
Total Views |
international market commodity rates


मुंबई :
       सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घट झाली असून एमसीएक्सवर सोने ७८,३५७ रुपयांच्या आसपास आला आहे. तर चांदीचे भाव ९४,२०६ रुपयांवर आले आहे. सकाळच्या सुरूवातीस एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क १८१ रुपयांच्या घसरणीसह ९४,१०३ रुपयांवर उघडला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती.


दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीला मोठी मागणी पाहायला मिळाली. त्याचबरोबर, वाढती मागणी असताना सराफा बाजारात ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून आली. लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी मागणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्या-चांदीच्या वायदेच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती मंदावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरू झाली. कॉमेक्सवर सोने २,७४६ डॉलर प्रति औंसवर उघडले.

आज दोन्हीच्या फ्युचर्स किमती घसरणीसह उघडल्या असून सोन्याचे वायदा भाव ७८,२०० रुपयांच्या आसपास होते. तर चांदीचे वायदे ९४ हजार रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. मागील दोन दिवासांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरणीसह सुरू झाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज २११ रुपयांच्या घसरणीसह ७८,२११ रुपयांवर उघडला.