बँक व्याजदर घटले!, 'ही' एफडी योजना देणार सर्वाधिक व्याज!

    23-Jan-2022
Total Views | 159

MX



नवी दिल्ली
: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफि इंडियानं आपल्या व्याजदरांमध्ये बदल केला. यासह प्रमुख बँकांपैकी एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आदींनीही व्याजदरात बदल केले. यापैकी काही बँकांमध्ये पाच ते सहा टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे. सर्वात जास्त व्याजदर मिळविण्यासाठी गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसाच्या राष्ट्रीय सेव्हींग टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात. जाणून घ्या कुठल्या पर्यायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल...

नॅशनल टाईम डिपॉझिट अकाऊंट



पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सेव्हींग स्कीम चालविण्यात येते. त्यापैकीच एक नॅशनल टाईम डिपॉझिट अकाऊंट स्कीम असते. ही एक मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) योजना आहे. यामध्ये एफडी अकाऊंट सुरू करण्याठी किमान हजार रुपये गुंतवणूक करू शकता. एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५.५ ते ६.७ टक्के व्याजदर मिळू शकतो. योजना वार्षिक स्वरुपातील असली तरीही व्याजदर तिमाही अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा!

पाच वर्षांपर्यंत ठेवींवर कर माफ


टाईम डिपॉझिट स्कीम आणि एफडीमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्स एक्ट १९६१ अंतर्गत सेक्शन 80C मध्ये वजावट मिळते. या अंतर्गत दीड लाखांपर्यंत सुट मिळते.




FD
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121