‘राईज लिस्ट’मध्ये नाशिक

    19-Jul-2025
Total Views | 13

जगात प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकास होत असताना, अलीकडे भारताने केलेली प्रगतीदेखील नोंद घेण्यासारखीच. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्किल इंडिया’तून त्याचे प्रभाव सर्वदूर दिसत आहेत. नुकत्याच जगातील एका सर्वांत मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने, आपली पहिली ‘सिटीज ऑन द राईज लिस्ट’ लॉन्च केली आणि त्यात भारतातील टॉप दहा शहरांवर प्रकाश टाकला. रोजगार बाजारपेठ आणि आर्थिक संधी वाढणार्‍या या देशातील महानगरात, महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश असल्याने आगामी काळात हे महानगरदेखील गतीने विकास करेल. हे झपाट्याने विकसित होत असलेले नॉन-मेट्रो हब्स व्यावसायिक संधी तर निर्माण करीत आहेतच मात्र, रोजगारनिर्मितीमुळे तरुणांपुढील नोकरीच्या आव्हानावरदेखील यामुळे उत्तर मिळाले आहे असे मानायला हरकत नाही. ही वाटचाल अशीच सुकर होत राहिली आणि याचे इतर शहरांनी अनुकरण-अनुसरण केले, तर अनेक चांगल्या गोष्टी साध्य होण्याला वाव मिळणार आहे, हे येथे अधोरेखित करावे लागेल.

विशेष म्हणजे, या यादीतील महानगरे भारतभरातील हायरिंग, रोजगारनिर्मिती आणि टॅलेंटमधील वाढीवर प्रकाश टाकतात. भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे आर्थिक बदलासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे, या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. जीसीसी गुंतवणुकीचा ओघ, स्थानिक एमएसएमई वाढ आणि सरकारचे विकसित भारताचे स्वप्न, लहान शहरांना महत्त्वपूर्ण करिअर हब्समध्ये बदलत आहेत. दहा उदयोन्मुख शहरे उद्योग, कार्ये आणि पदांसंदर्भात स्थानिक ठिकाणीच खर्‍या संधी देत आहेत. तंत्रज्ञान, फार्मा व आर्थिक कंपन्या येत असल्याने, भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे ’टॅलेंट आकर्षण’ बनत आहेत. डेटा आणि ‘एआय’मधील आजच्या काळात, मिरॅकल सॉफ्टवेअर सिस्टम्स, इन्क (विशाखापट्टणम), एचसीएलटेक (विजयवाडा, मदुराई), इन्फोसिस (विजयवाडा), डेटामॅटिस (नाशिक), बुल आयटी सर्व्हिसेस (मदुराई) यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्याही द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आपला प्रभाव दर्शवित आहेत. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, उदयोन्मुख शहरांमध्ये हायरिंग वाढीसाठी व्यवसाय विकास आणि अभियांत्रिकीपदांचा मोठा हातभार लागत असल्याचेदेखील निदर्शनास आले आहे.

विधिमंडळात पुणे

राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी सत्र आटोपले. या काळात पुणे महानगरातील भाजपच्या आणि अन्य पक्षांच्या आमदारांनी, आपल्या भागातील समस्या आणि त्यावर समाधान काढण्यासाठी सरकारला भाग पाडण्याची केलेली कामगिरी तसेच, विकासात्मक कामांचा केलेला पाठपुरावा राज्यातील अन्य आमदारांच्या कामगिरीपेक्षा सरस ठरला. असे असले, तरी पुणे शहर गेल्या काही दिवसात ज्या वेगाने विकासाची वाटचाल करीत आहे, त्यातून हे महानगर आता लवकरच जगाच्या नकाशावरदेखील एक महत्त्वाचे उपयुक्त आणि लाभदायी शहर ठरणार असल्याचे दिसेल, यात संदेह नाही. नजीकच्या राजधानी असलेल्या मुंबई शहराशी असलेला कनेक्ट आणि पुण्यात जगभरातील कंपन्यांनी आणलेले मोठे प्रकल्प आगामी काळात आणखी रोजगार निर्मितील चालना देतील, हेदेखील येथे अधोरेखित करावे लागेल. हिंजवडी, कोरेगाव पार्क, खराडी आणि अन्य भागांतील कंपन्यांच्या होत असलेल्या विस्तारामुळे, राज्यातील अन्य शहरातूनदेखील बहुतांश तरुणाई येथे नोकरीसाठी प्रयत्नरत असते, हे आजवरचे चित्र आहे. आगामी काळात ते अधिक व्यापक दिसणार असल्याने, आपसूकच महानगराचा विस्तार आणि पूरक विकासदेखील झपाट्याने होणार हे ओघाने आलेच. बांधकाम क्षेत्र जसे येथे विस्तारित आहे, तसे येथे वैद्यकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रदेखील कात टाकू लागले आहे. रेल्वेचा विकास, मार्गांची संख्या, विमानतळाचा विस्तार, नवे विमानतळ, महामार्गाची निर्मिती, मेट्रोचा विस्तार, अन्य दळणवळण यंत्रणांना मिळत असलेली चालना आणि पायाभूत सुविधांवर भर, या जमेच्या बाजू या महानगराला एका वेगळ्या उंचीवर नजीकच्या काळात नेतील, यात शंका वाटत नाही.खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि खासदार व मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांचे विशेष लक्ष, या महानगरावर असल्याचेदेखील या काळात अनेकदा दिसून आले आहे. पुण्यानजीक आता पर्यटन जगताच्या हालचालीदेखील अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात, आगामी काळात पर्यटनाचीदेखील आघाडी पाहायला मिळेल आणि या क्षेत्रातदेखील अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, यात शंका नाही.

अतुल तांदळीकर
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121