सोन्याच्या दरात वाढच

    28-Feb-2022
Total Views |
                    
gold
 
 
मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीचे दर सातत्याने वाढतच आहेत.सोन्याच्या दरांनी ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. सोमवारी प्रति १ तोळा सोन्यामागे ८०० रुपयांची वाढ होऊन ५०,९९० रुपये इतका दर झाला आहे. चांदीच्या दरांमध्येही १.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रती किलोमागे आता ६५,८६९ रुपये इतका दर झाला आहे. युद्ध सुरु असताना इतर सर्व घटकांमध्ये अस्थिरता दिसत असली तरी सोन्या- चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढच दिसत आहे.
 
 
का वाढतेय सोन्याची किंमत?
जागतिक पातळीवर जेव्हा आर्थिक अस्थैर्य तयार होते तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ होत असते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोने हे जागतिक पातळीवर गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक मानला जातो. सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असल्याने महत्वाच्या देशसुद्धा सोन्यात गुंतवणूक करत असतात. भारत देशातही भारतीय रिझर्व्ह बँक सोन्यात गुंतवणूक करत असते. अत्यंत अडचणीच्या काळात सोने विकून आर्थिक मदत मिळवता येते. त्यामुळॆ जागतिक अशांततेच्या काळात सोन्याच्या दरांत वाढ होताना दिसून येते.