
राज्यातील नागरिकांसाठी दिलादायक बातमी
मुंबई: राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर आता कमी केले असल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना चाचणीची किंमत आता जवळपास २८० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे अत्यावश्यक आहे. व या अनुषंगाने सदर निर्णय निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल.
याआधी कोरोनाची चाचणी करण्यासाठी ९८० रुपये मोजावे लागत असत. पण आता ही किंमत ७०० रुपये करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना चाचणीसाठी काही हजार रुपये मोजावे लागायचे. आणि जर घरी जाऊन एखाद्या व्यक्तीचा स्वॅब घेतला तर त्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या पीपीई कीटचे सुद्धा वेगळे पैसे मोजावे लागत होते. ज्यावर नंतर सरकारने नियंत्रण आणले.