या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज - मधू
Read More
प्रयागराज बॉम्बस्फोटात जुना कटरा बाजारात अलीकडेच बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. त्यांची ओळख अब्दल्ला. मनजीत आणि अदनान अशी आहे. या संबंधित घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
(Khokya Bhosale Arrested) बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या अर्थात सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. खोक्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
Beef उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकतीच महाकुंभची सांगता झाली आहे. यानंतर आता काही लोक जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या घराबाहेर गोवंशी प्राण्यांचे मांस फेकून उन्माद करत आहेत. गोवंशी मांसाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले आढळले आहेत. शहरातील दरियाबाद पोलीस ठाण्याजवळील असणाऱ्या रस्त्यावर आणि नाल्यात एका गोवंशी वासराचे धड पडल्याचे आढळले आहे.
कुंभमेळ्याला जाणार्या श्रद्धाळूंची वाहतुककोंडीबाबत काही तक्रारच नाहीच. सर्व भेदाभेद विसरून कोट्यवधी हिंदू एकत्र येऊ शकतात, ही गोष्टच विरोधकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यातून एका योगी साधूने, इतक्या भव्य प्रमाणात एका हिंदू सणाचे भव्य आणि यशस्वी आयोजन केल्यानेही विरोधकांची झोप उडाली आहे.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभाचा समारोप होत असून अनेकांना ओढ लागलीये ती नाशिक येथे येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची... #Prayagraj #Nashik #Trimbakeshwar #SinhasthaKumbhmela #News #Hindu #Sanatan #MahaMTB
Naziya Khan भाजप पक्षाच्या प्रवक्त्या नाझिया इलाही खान (Naziya Khan) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रयागराज महाकुंभला जात असताना हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी नाझिया यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचे वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. त्यांनी त्यांच्या वाहनाचा फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. नाझिया मुस्लिम असल्या तरीही त्या हिंदू धर्माचे समर्थन करतात.
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गृहविभागाच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गृहविभागाची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीस हे प्रयागराजला रवाना होणार आहेत.
महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था असून ती बघून जगभरातील लोक अचंबित झाले आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ते प्रयागराज येथे दाखल झाले असून त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
पवित्र कुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. जातीपातीपलीकडे जाऊन संतमहंत हे सर्व हिंदू समाजाचे संतमहंत आहेत, हा संदेश यामध्ये होता. या महत्त्वाच्या घटनेच्या अनुषंगाने ‘भटके- विमुक्त विकास परिषदे’चा महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून भटके-विमुक्त समाजाच्या सद्यस्
PM Narendra Modi) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
Mahakumbh 2025 प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी (Mahakumbh 2025) आलेल्या महिला भाक्तांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बरेलीमधील कट्टरपंथी तरुणाविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साबीर हुसैन असे आरोपी तरुणाचे नाव असून तो बरेलीमधील मीरगंजचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे शुक्रवारी सांगितले.
‘करून करून भागला, देवपूजेला लागला’ ही म्हण, जणू रोहित पवारांसाठीच ( Rohit Pawar At Mah Kumbh ) तयार झाली असावी. काल-परवा त्याचे प्रत्यंतर आले. सनातन धर्माच्या रुढी, परंपरांवर अत्यंत खालच्या पातळीत विधाने करून झाल्यानंतर, हे महाशय थेट दिसले ते कुंभमेळ्यात! ब्रिगेडींचे शिरोमणी, थोरल्या पवारांच्या नातवाला या पवित्रस्थळी पाहून, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयुष्यभर पवारांनी हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवले आणि पुरोगामित्वाची ‘हिरवी’ शाल पांघरली. पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनीही तीच री ओढली. विशिष्ट
Maha Kumbh 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभातील (Mahakumbh 2025) अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६० जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने ही माहिती दिली आहे. या घटनेवर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली जाईल. तसेच या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आवश्यक त्या सूचनाही बदलण्यास सांगितल्या आहेत.
Maha kumbh 2025 अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी २९ जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीसंबंधित दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांचे त्यांनी सांत्वन केले आहे. तसेच मृतांना आणि बाधितांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X पोस्टवर घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी आश्वासन दिले की सरकारच्या समन्वयाने, पीडितांना मदत केली जाईल असे त्यांनी नमूद केले होते.
Mahakumbh Mela 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेनंतर आता महाकुंभामध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार ३० जानेवारी २०२५ रोजी सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून आग शमवन्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये सध्या महाकुंभमेळा (Mahakumbh Mela 2025) सुरु आहे. यासाठी देशातूनच नाहीतर जगभरातून भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. मात्र या महाकुंभमेळ्यात २८ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारात दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने भाविक भक्तगण हे जखमी झाले आहेत. तर काहीजण मृत्यू पावल्याचे बोलले जात आहे. मात्र अशातच आता सोशल मीडियावर अहिंदू कट्टरपंथींनी घडलेल्या घटनेची खिल्ली उडवली आहे.
महाकुंभमेळा २०२५ प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यात मंगळवारी २८ जानेवारी २०२५ रोजी संगम घाटावर भाविकांची अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी वाढली होती. त्यावेळी गर्दीमुळे नागा साधू आल्याची अफवा पसरल्याने असंख्य भाविकांनी पळापळ झाली. घटनेदरम्यान अनेकजण गर्दीमध्ये चिरडले गेले. या घटनेला आता काही तास उलटून गेले आहेत. या अपघातात ९० जण भाविक जखमी झाले असून ३० जण भाविक मृत पावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला महाकुंभ मेळा ( Maha Kumbh Mela ) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठचे खासदार अरुण गोविल यांनी महाकुंभ मेळ्यात पत्नीसोबत हजेरी लावत त्रिवेणी संगमात डुबकी घेतली. त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच पंडित धीरेंद्र शास्त्री यांचीही भेट घेतली. मां गंगा, मां यमुना आणि मां सरस्वती सर्वांचे कल्याण करो, असे म्हणत अरुण यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभने अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. कोट्यवधी भाविकांचा हा मेळावा कायमच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. सनातन धर्माच्या भव्यतेचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे एकवटतात. अशातच आता महाकुंभ अंतराळातून कसा दिसतो याचं एक अत्यंत देखणं चित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ ( Maha Kumbh Mela ) सुरु आहे. त्यासाठी लाखो भाविक येथे जात आहेत. त्यातच आता सरकारने आकडेवारी जारी केली आहे. २७ जानेवारी रोजी ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी घेतली. उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान अमित शाह महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत.
(Amit Shah) प्रयागराज येथे महाकुंभात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कुटुंबासह अनेक संत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्रिवेणी संगम येथे स्नान करून आरती केली.
Mahakumbh Mela 2025! मध्ये लाखो भक्तांचा जनसमुदाय लोटला गेला आहे. उद्योगपतींपासून ते परदेशी भाविकांनी महाकुंभाला आपली उपस्थिती दर्शवली होती. अशातच आता महाकुंभमेळ्यात क्रीडापटूंची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. दि : २६ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभ मेळ्यात माजी क्रिकेटपटू सुरैश रैनाने पवित्र स्नान केले. त्यानंतर महिला बॉक्सर मेरी कोम यांनीही पवित्र स्नानाचा आनंद घेतला आहे.
Mahakumbh Mela 2025 काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी प्रयागरामध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत असभ्य टिप्पणी केली आहे. महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी दावा केला की, १२ वर्षातून एकदा महाकुंभमेळा साजरा केला जातो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग आजार पसरला जात असल्याचे सांगितले जाते आहे.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा २०२५ (Mahakumbh Mela) सुरू आहे. यामुळे अनेक भाविक भक्तगण याठिकाणी सामिल झाले आहेत. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांनी महाकुंभाला अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता महाकुंभातील नागाबाबा प्रचंड संतापले आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये काही लोक महाकुंभमेळा बदनाम करत असल्याचे बोलले जात आहे.
महाकुंभमेळ्यात, ( Maha Kumbhamela ) आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रयागराज येथे पहिले अमृतस्नान होत आहे. तब्बल २५ हजार कोटींची उलाढाल या महाकुंभमेळ्यात होईल, असा अंदाज आहे. अर्थकारणाच्या सर्व घटकांना चालना देणारा हा महाकुंभ आहे. त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम येणार्या काळात दिसून येतील.
मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज ( Prayagraj Mahakumbh ) येथे आजपासून ‘महाकुंभ’ला सुरुवात होत आहे. दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाकुंभ’ होत आहे. यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुमारे ४० कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे. आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले अमृत स्नान होत असून दि. १४ जानेवारी मकर संक्रांती, दि. २९ जानेवारी मौनी अमावस्या, दि. ३ फेब्रुवारी बसंत पंचमी, दि. १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या अमृत स्नानाच्या एकूण सहा तारखा
Maha Kumbh Mela पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रयागरामध्ये आयोजित महाकुंभमेळ्यास दि : १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. सकाळपासून लोखांच्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय लोटला आहे. प्रयागराजमधील विविध घाटांवर श्रद्धाळू भाविक स्नान करण्यास आपली हजेरी लावत आहेत. या उत्सवामध्ये भारतीयांसोबत परदेशी भाविकांचाही समावेश आहे. कुंभमेळ्याला काहींनी मोक्षप्राप्तीचा मारप्ग असल्याचे म्हटले आहे. श्रद्धेचा महापूर पाहून परदेशी नागरिक थक्क झाले असून मेरा भारत महानचा नारा परदेशी नागरिकांनी दिला आहे.
प्रयागराजमध्ये होत असलेला, महाकुंभ ( Prayagraj Mahakumbh ) हा परमेश्वरी कृपा आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणे, म्हणजे मोक्षप्राप्तीच. हा एक धार्मिक विधी नाही, तर आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि भगवंताशी संपूर्णतः एकरूप होण्याचा अनुपम योग आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये महाकुंभाचे महत्त्व अनादिकालापासून सांगितले गेले आहेच. महाकुंभ म्हणजे हा परमात्म्याच्या साक्षात्काराचा आणि ईश्वरी तेजाच्या अनुभूतीचा प्रसादच. या महाकुंभाविषयी परंपरेचा घेतलेला
प्रयागराज येथील कुंभमेळा ‘वक्फ’ बोर्डाच्या ( Waqf Board ) जागेवर भरत असल्याचा दावा, एका भंपक मुस्लीम नेत्याने केला. त्यामुळे ‘वक्फ’ बोर्डाच्या कायद्यात सुधारणेची किती निकड आहे, तेच स्पष्ट होते. काँग्रेसने केलेल्या पापांची शिक्षा हिंदूंच्या किती पिढ्यांनी भोगायची, त्याला काही मर्यादा आहे की नाही? अशा कायद्यांमध्ये बदल ही काळाची गरज झाली आहे.
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची ( Prayagraj kumbha Mela ) तयारी सुरू आहे. दरम्यान, खलिस्तानी संघटना ’शीख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा चिथावणीखोर विधान केले आहे. त्यामधून त्याने हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्याचे आवाहन केले आहे. “महाकुंभमेळ्यात अडथळा आणण्यासाठी प्रयागराज चलो,” असे त्याने म्हटले आहे. त्याबरोबरच पन्नू याने या व्हिडिओमधून विमानतळांवर समर्थकांना खलिस्तान आणि काश्मीरचे झेंडे फडणवण्यास आवाहन केले आहे. मात्र, बहुतांश लोक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याकडून दिल्या जाणा
नवी दिल्ली : “प्रयागराज ( Prayagraj ) येथील महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे ५ हजार, ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पितवृत्तीने कार्यरत असल
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या रसुलाबाद घाटाचे ( Rasulabad Ghat ) नाव बदलण्यात आले आहे. हा घाट आता ’चंद्रशेखर आझाद घाट’ या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून प्रयागराज महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा औपचारिक आदेश आठवडाभरात जारी करून तेथे नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येऊन दरदिवशी रामललाचे दर्शन घेत आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई ते अयोध्या रेल्वे सेवा असली तरी भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना अयोध्या प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्याहून थेट अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पहिली बस धुळ्याहून अय
काशी हे भारतातील अत्यंत प्राचीन शहरांपैकी एक शहर. ज्ञानाची नगरी म्हणूनही काशीची ओळख. काशीचा इतिहास म्हणजे हिंदू धर्माचाच इतिहास, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आर्यांच्या संस्कृतीचे, विद्यांचे आणि तत्त्वज्ञानाचे माहेरघर म्हणून या शहराची ख्याती असून, अद्याप ती थोड्या फार फरकाने तशीच कायम आहे. वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म या ठिकाणाहून सर्व भरतखंडात विस्तार पावले आणि सर्व भारतात हे शहर अत्यंत पवित्र असे यात्रेचे ठिकाण मानले गेले. नुकतेच या काशी शहरात सलग दुसर्यांदा भेट देण्याचा योग आला. त्या अंतर्बाह्य अनुभवसंप
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एका कुटुंबाचे सामूहिक धर्मांतर झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात राहणाऱ्या मौलवी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर हा आरोप लावण्यात आला आहे. पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने तिच्या मुलीवर केवळ बलात्कारच केला नाही तर तिच्यासोबत अश्लील कृत्यही केले.तसेच पीडित मुलीने विरोध केल्यावर तिच्या केसांना धरून मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर आरोपीने पीडितेला थुंक चाटायला ही लावली. यावेळी पीडितेला मजारमध्ये न आल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पोलिसांनी दि. ५ डिसेंबर २०२३ रो
उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) विभागातील प्रयागराज स्थानकावरील प्रमुख अपग्रेडेशन यार्ड कामांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील सहा विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका विद्यार्थ्याने इंजिनीअरिंग कॉलेजच्या बस कंडक्टरवर हल्ला करत धारदार शस्त्राने गळा कापला आहे. लारेब हाशमी असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आंतरधर्मीय लिव्ह-इन जोडप्याची पोलिस संरक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. विरुद्ध लिंगाच्या आकर्षणामुळे असे संबंध प्रामाणिकपणाशिवाय तयार होतात, जे अनेकदा केवळ मनोरंजनात बदलतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती मोहम्मद अझहर हुसैन इद्रीसी यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, न्यायालय दोन महिन्यांच्या कालावधीत आणि तेही २०-२२ वर्षांच्या वयात अशी अपेक्षा करू शकत नाही की, दोघेही आपल्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार कर
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी २ जणांना देशी बनावटीच्या ७ बॉम्बसह अटक केली आहे. दोन्ही आरोपी नात्याने पिता-पुत्र आहेत, जे माफिया अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या जवळ आहेत. अनीस अख्तर आणि त्याचा मुलगा मोहम्मद रेहमान अशी त्यांची नावे आहेत. उद्ध्वस्त करण्यात आलेल्या अतिक अहमद यांच्या कार्यालयात हे दोन्ही आरोपी बॉम्ब लपवण्यासाठी घेऊन जात होते. मात्र पोलिसांनी दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी ही कारवाई केली. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी अतिक अहमदच्या २ मुलांची बालगृहातून सुटका झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या उत्सव आणि मि
राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी (एनआयए) माकप – माओवादी या नक्षलवादी गटाविषयी उत्तर प्रदेशातील प्रयागराज, वाराणसी, चंदौली, आझमगड आणि देवरिया जिल्ह्यात छापेमारी केली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील कोरांव तहसीलच्या खीरी गावात १६ वर्षीय सत्यम शर्माला बेदम मारहाण करण्यात आली. तो दहावीचा विद्यार्थी होता. चुलत बहिणीचा विनयभंग केल्याचा निषेध केल्याने तिला मारहाण करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
प्रयागराजच्या लुकरगंजमध्ये माफिया अतीक अहमदच्या ताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट बांधण्याचा निर्णय सीएम योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांनी या इमारतीची पायाभरणी केली होती. तरी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या वाटपासाठी ६ जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
अतिकसारख्या माफियांना गोळ्या घालून मारल्याबद्दल बाहेरच्या देशाने गळा काढून रडण्याचे काहीच कारण नव्हते. भारतातील मुस्लीम सुरक्षित आहेत. त्यांची काळजी घेण्यास देशाचे सरकार समर्थ आहे. बाहेरच्या कोणी उगाच आमच्या देशात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये, असे बहारीनला ठणकावून सांगण्याची गरज आहे.
कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये रुग्णालयाच्या बाहेर दि.१५ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्यावेळी १० ते १२ पोलीसांसह पत्रकार ही तेथे होते. त्यावेळी पत्रकाराच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी त्या दोघांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. अतिक अहमदच्या तर थेट कानावर बंदूक लावून गोळी झाडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर देशभर या प्रकाराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान तोच प्रसंग दि.२० एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये पुन्हा उभा राहिला.
"आता राज्यात कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही", असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच जे एकेकाळी उत्तर प्रदेशच्या अस्मितेसाठी संकट होते. त्यांच्यासाठी आता संकट उभे राहिले आहे, असे ही ते यावेळी म्हणाले. दि.१८ एप्रिल रोजी लखनऊ येथील लोक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. १५ एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांचे हे पहिले जाहीर भाषण होते. त्याआधी, अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना पोलि
उत्तर प्रदेशमधील कुख्यात दहशतवादी धर्मांध अतिक याच्यावर तो पोलीस बंदोबस्तात तसेच माध्यमांच्या गराड्यात असताना, त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेवरून विरोधकांनी प्रशासनाविरोधात आरोप करण्यास सुरुवात केली आहे, तर त्याच्या मृत्यूबद्दल आक्रोश करण्यात येत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे
गुजरातमधील साबरमती कारागृहातून माफिया अतिक अहमदला पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये आणण्यात आले आहे. त्यामुळे एन्काउंटरची भीती त्याला पुन्हा सतावू लागली आहे. उमेश पाल खून प्रकरणात अतिकला आरोपी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता यूपी पोलिसांचे पथक साबरमती कारागृहात पोहोचले आणि अनेक तासांच्या प्रक्रियेनंतर अतिकसोबत प्रयागराजकडे निघाले आहे.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात गुन्हेगारी नष्ट करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. एका आकडेवारीनुसार, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ वर्षात उत्तर प्रदेशमध्ये एनकाउंटरमध्ये मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची संख्या १७८ पेक्षा जास्त आहे. तसेच अलीकडेच प्रयागराजमध्ये उमेश पालच्या हत्येनंतर अतिक अहमदच्या दोन गुंडांचे एनकाउंटर झाला आहे. मार्च २०१७ पासून आतापर्यत १०,७१३ पोलीस-गुन्हेगारामध्ये चकमकी झाल्या आहेत.