मुंबई : उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) विभागातील प्रयागराज स्थानकावरील प्रमुख अपग्रेडेशन यार्ड कामांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील सहा विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
रद्द विशेष रेल्वे सेवा
१) ०१०२५ दादर-बलिया स्पेशल एक्स्प्रेसच्या दि. २७ नोव्हेंबर ते दि. ५ जानेवारी २०२४पर्यंत एकूण १८ फेऱ्या
२) ०१०२६ बलिया-दादर एक्सप्रेस - दि. २९ नोव्हेंबर ते दि. ७ जानेवारी २०२४पर्यंत एकूण १८ फेऱ्या
३) ०१०२७ दादर गोरखपूर एक्सप्रेस - दि. २८ नोव्हेंबर ते दि. ७ जानेवारी २०२४पर्यंत एकूण २४ फेऱ्या
४) ०१०२८ गोरखपूर दादर एक्सप्रेस - दि. ३० नोव्हेंबर ते दि. ९ जानेवारी २०२४पर्यंत एकूण २४ फेऱ्या
५) ०७६५१ जालना-छपरा एक्सप्रेस - दि. २९ नोव्हेंबर ते दि. ३ जानेवारी २०२४पर्यंत एकूण ६ फेऱ्या
६) ०७६५२ छपरा जालना एक्सप्रेस - दि. १ डिसेंबर ते दि. ५ जानेवारी २०२४पर्यंत एकूण ६ फेऱ्या
माणिकपूर-प्रयागराज छेओकी-वाराणसी मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
१) १५०१७/१८ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलएलटी) गोरखपूर एक्स्प्रेस - दि. २६ नोव्हेंबर ते दि. ८ जानेवारी २०२४पर्यंत
२) १५२६७/६८ एलएलटी रक्सौल एक्स्प्रेस - दि. २७ नोव्हेंबर ते दि. ६ जानेवारी २०२४पर्यंत
३) ११०३७/३८ पुणे गोरखपूर एक्स्प्रेस - दि. ३० नोव्हेंबर ते दि. ६ जानेवारी २०२४पर्यंत
४) ११०३३/३४ पुणे दरभंगा एक्स्प्रेस - दि. २९ नोव्हेंबर ते दि. ५ जानेवारी २०२४पर्यंत
5) १८६०९/१० एलएलटी रांची एक्स्प्रेस - दि. २९ नोव्हेंबर ते दि. ५ जानेवारी २०२४पर्यंत
६) २२१३१/३२ पुणे वाराणसी एक्स्प्रेस - दि. २७ नोव्हेंबर ते दि. ३ जानेवारी २०२४पर्यंत
७) १२७९१/९२ सिकंदराबाद दानापूर एक्स्प्रेस - दि. २७ नोव्हेंबर ते दि. ७ जानेवारी २०२४पर्यंत
वळवण्यात आलेल्या वरील गाड्यांना प्रयागराज छेओकी स्टेशनवर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.