शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा निवडणुकीची जबाबदारी - मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मुंबई पालिकेतील शिक्षकांची नेमणूक

    23-Jun-2025   
Total Views | 11

मुंबई, शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. या अनुषंगाने, जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी, मुंबई शहर जिल्हा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले.

या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठीदेखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून वेळोवेळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच धर्तीवर आणि माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

नियम काय?

तथापि, नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मुळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता त्यांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ऑनलाइन पद्धतीने निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही. तसेच, या कामकाजासाठी माननीय आयोगाच्या नियमांप्रमाणे मानधन दिले जाईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121