
आषाढी एकादशी निमित्त रविवारी ६ जुलै २०२५, रोजी सकाळी ११.०० वा. विरारमध्ये अभंग स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले आहे. यंग स्टार ट्रस्ट मार्फत आयोजित या अभंग स्पर्धेत स्पर्ध्यां विजेत्याला रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हि स्पर्धा विरार येथील जूने विवा कॉलेजच्या सेमिनार हॉल येथे संपन्न होणार आहे.देशासह अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर च्या सावळ्या विठोबाची आषाढी वारी म्हणजे संतांच्या पवित्र भूमीतली भाववारी. महिला वारकऱ्यांच्या डोईवर तुळशी वृंदावन तर तुलशिमाळ गळा, टाळ, मृदुंगाच्या तालात पुतुष्ट वारकऱ्यांच्या ओठी अभंगवाणी , वारीचा एकच ध्यास , एकादशीला पांडुरंगाचा मिळो सहवास.अश्या दरसालच्या भक्ती वारीला ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी ही अभंग स्पर्धा म्हणजे विठुरायाला मनातून भेटण्याचा योग् असल्याचे या अभंग स्पर्धेवेळी विठ्ठल भक्तांकडून मानले जाते. यामुळे या स्पर्धेला भाविक गर्दी करतात .त्यामुळे या स्पर्धेत ज्यांना अभंग गायचे आहेत त्यांनी व अभंग श्रवण करणाऱ्यांनी कार्यक्रम माहितीसाठी मुग्धा लेले : 9922768531,मिलिंद पोंक्षे : 7350006173,स्वाती जोषी : 9423027631,रवि पिल्ले : 9320486777,सुरेखा कुरकुरे : 9764052212,भूषण चूरी : 7875344574
शांताराम वाळींजकर : 9850674027 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे. याबाबत अधिक सूचनांसाठी संपर्क समन्वयक : अजीव पाटील : 9823146373 यांच्याशी संपर्क करावा .