मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाकुंभमेळ्याला देणार भेट
14-Feb-2025
Total Views |
मुंबई : (CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गृहविभागाच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गृहविभागाची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीस हे प्रयागराजला रवाना होणार आहेत.
महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीतील बैठकीनंतर प्रयागराजला जाणार असल्याची माहिती आहे. ते महाकुंभमेळ्यात जाऊन गंगेत पवित्र शाही स्नान करणार आहेत. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे.