लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका विद्यार्थ्याने इंजिनीअरिंग कॉलेजच्या बस कंडक्टरवर हल्ला करत धारदार शस्त्राने गळा कापला आहे. लारेब हाशमी असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. सिव्हिल लाइन्स भागातून करछना येथे निघालेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये २४ वर्षीय हरकेश विश्वकर्मा हा कंडक्टर होता. दरम्यान, युनायटेड इंजिनीअरिंग कॉलेजमधील बी-टेक प्रथम वर्षाचा २० वर्षीय लारेब हाश्मी त्या बसमध्ये चढला.
त्यानंतर काही वेळातच कंडक्टरने लारेब हाश्मीला भाडे मागितले. त्यावेळी भाडे कमी-जास्त होण्याच्या मुद्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. काही वेळात लारेब हाश्मीच्या कॉलेजच्या गेटजवळ बस पोहोचली. त्याने आपल्या बॅगेतून धारदार शस्त्र बाहेर काढून कंडक्टर हरकेश विश्वकर्मा याच्या मानेवर वार केले आणि नंतर कॉलेजच्या गेटमधून आत शिरला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही लोकांनी पीडित हरकेशला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
#प्रयागराज में हुई दिल दहला देने वाली वारदात। यूनाईटेड इंजीनियरिंग कॉलेज में बी टेक के छात्र ने कंडक्टर को मारा चापड़। लारेब हाशमी ने कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा की चापड़ से काटी गर्दन। कंडक्टर गंभीर अवस्था में मेडिकल कॉलेज में भर्ती। बस ड्राइवर मंगला प्रसाद यादव ने बताया छात्र… pic.twitter.com/DLfMhD4u17
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडीओतील व्यक्ती आरोपी लारेब हाश्मी असल्याचे सांगितले जात आहे. हरकेशने मुस्लिमांचा अपमान केल्याने त्याच्यावर हल्ला केला असल्याचे लारेबने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.