लखनऊ : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात गुन्हेगारी नष्ट करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. एका आकडेवारीनुसार, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ वर्षात उत्तर प्रदेशमध्ये एनकाउंटरमध्ये मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची संख्या १७८ पेक्षा जास्त आहे. तसेच अलीकडेच प्रयागराजमध्ये उमेश पालच्या हत्येनंतर अतिक अहमदच्या दोन गुंडांचे एनकाउंटर झाला आहे. मार्च २०१७ पासून आतापर्यत १०,७१३ पोलीस-गुन्हेगारामध्ये चकमकी झाल्या आहेत.
मात्र, गुन्हेगारांशी झालेल्या चकमकीत १२ पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. २०२२ मध्ये पोलीसांच्या चकचकीत मरण पावलेल्या गुन्हेगारांची संख्या सर्वात कमी होती. याउलट २०१८ सर्वाधिक गुन्हेगार मारले गेले.मात्र योगी आदित्यनाथ यांनी प्रथमच सत्ता हाती घेतल्यानंतर त्याच वर्षी ८१ गुन्हेगारांना कारवाईत ठार करण्यात आले. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये २८ , २०१९ मध्ये ३४, २०२० मध्ये २६, २०२१ मध्ये २६ आणि २०२२ मध्ये १४ गुन्हेगार मारले गेले. तसेच २०२३ मध्ये दोन महिन्यात ९ गुन्हेगार मारले गेले आहेत. त्याचबरोबर ६ वर्षात उत्तर प्रदेश पोलीसांनी २३,००० हून अधिक गुन्हेगारांना तुरुंगात टाकले आहे.