" भाषेच्या विकासासाठी, आपल्याला प्रथम भाषाविचाराला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. भाषेचा विकास कसा होतो, त्याच्या विचारविश्वाची व्याप्ती काय हे समजून घेणे गरजेचे आहे " असे मत भाषा अभ्यासक तथा बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या " मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती" या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष मधुकर वर्तक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे उपस्थित होते.
Read More
"कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष
Compulsion Hindi Language नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर होताच, भाषिक राजकारणही पेटले. या विषयावर समाजमाध्यमांमध्येही वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यानिमित्ताने भाषा, संस्कृती, साहित्य यांच्यातील परस्पर संबंध, शिक्षणातील त्रैभाषिक सूत्र याविषयीचे विविध कंगोरे ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य आणि ‘साहित्य भारती, महाराष्ट्र’चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
कामगार आहे, तळपती तलवार आहे, सारास्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे, असं म्हणत कामगारांच्या वेदनेला शब्दबद्ध करणारे महाकवी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा जागार व्हावा यासाठी सुर्वे मास्तरांचे एक दिवसीय साहित्य संमेलन पार पडले. स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन दि. २७ मार्च रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडले. या एक दिवसीय साहित्य संमेलनात काव्यवाचन, परिसंवाद, एकांकिका सादरीकरण या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाला १ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १२ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा पुरस्कार देण्यात आला.
"आपल्याला इरावतीबाई कर्वे यांचे कार्य केवळ युगांत या ग्रंथपुरतेच ठाऊक असते, परंतु इरावतीबाईंनी आपल्या कार्यातून भारतीयत्वाचा शोध घेतला हे आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रतिभा कणेकर यांनी व्यक्त केले. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयातील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
साहित्य संमेलनाला दिल्लीमध्ये सुरुवात झाली आहे. पुढील दोनच वर्षात मराठी साहित्य संमेलन हे त्याची शंभरी गाठेल. मात्र, शंभराव्या वर्षात पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या संमेलनाला आजही सरकारी अनुदानावरच अवंलंबून राहावे लागत आहे. त्यातून निर्माण होणारे वादंग हा वेगळाच विषय. त्यामुळे, आर्थिक स्वावलंबन हा विषय साहित्य संमेलनातील धुरीणांनी मनावर घेणे काळाची गरज आहे...
नवी दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनामध्ये दिल्लीतच तब्बल ९० ते १०० वर्षे कार्यरत मराठी संस्थांना डावलण्याचा पराक्रम घडला आहे. त्यामुळे दिल्लीतील संमेलनातून राजकीय अजेंडे रेटण्याव्यतिरिक्त नेमके काय घडले, असा प्रश्न उपस्थित होतो.
भारतातच नाही, तर जगातील इतर कुठल्याही भाषेचे साहित्य संमेलन गेली 98 वर्षे भरत आलेले नसेल, असे मला वाटते. त्यामुळे दोन वर्षांनी शंभरी गाठणारे मराठी साहित्य संमेलन, हा एक जागतिक विक्रमच ठरेल. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे दरवर्षी संमेलन येऊ घातले, की काही काही गोष्टींवर तीच तीच चर्चा, तीच तीच टीका-टिप्पणी होत असते. संमेलन एकदा पार पडले, की परत पुढील संमेलन येईस्तोवर सर्व कसे शांत शांत असते. या वर्षभराच्या काळात ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ काय करीत असते, कोणास ठावूक?
नवी दिल्ली येथील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘सरहद पुणे’ आणि ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनाची शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात सुरुवात आली. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त जुन्या संसद भवनापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला.
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, समांतर पण वेगळे असे विद्रोही साहित्य संमेलन या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या तीन दिवसात पार पडणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन झाले. या बोधचिन्हाचे प्रकाशन मुस्तजीब खान यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे. साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड
(MLA Amit Gorkhe) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न द्या, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी विधान परिषदेत केली.
देर आये दुरुस्त आये’ असे यंदाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कारां’बाबत म्हणावे लागतेय. डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला, याचा सर्वसामान्य वाचकालाही आनंद झाला, ही लक्षणीय गोष्ट आहे. यापूर्वी समीक्षक रा. ग. जाधव यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा असाच सर्व थरांतून लोकांनी आनंद व्यक्त केला होता. कोणत्याही कंपूत, गटात, वादात सामील नसलेल्या, स्व-धर्म निष्ठेने आणि कसोशीने पाळणार्या अशा अगदी मोजक्या माणसांचे कर्तृत्व फारसे माहिती नसले, उत्सवी स्वरूपाचा त
या वर्षी ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात सुद्धा झाली आहे. याआधी १९५४ साली म्हणजे तब्बल ६० वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
(Sahityaratna Annabhau Sathe Chowk) मनोरा आमदार निवासासमोरील चौकाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव देण्यात येणार असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष तथा कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन होणार आहे.
(Raj Thackeray)फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. पुण्यातील टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडला. यावर्षी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेतर्फे संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेत
रघुकुलतिलक श्रीरामाचे सकल मराठी संतांनी गुणसंकीर्तन केले असले, तरी श्रीरामकथेवर मराठीत स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे पहिले संत एकनाथ आहेत. त्यानंतर समर्थ रामदासस्वामी आणि तिसरे संतकवी श्रीधर (नाझरेकर) आहेत. संतकवी श्रीधर यांनी १७०३ साली श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ‘रामविजय’ लिहिला. ४० अध्यायी ९ हजार, १४७ ओव्यांचा ‘रामविजय’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भाविकातील सर्वाधिक लोकप्रिय पारायण ग्रंथ आहे. ‘रामविजय’ एवढी अफाट स्वीकृती लोकप्रियता महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ग्रंथास लाभलेली नाही. आजही गावांगावांमध्ये ‘रामायण’ पारायण
कोकणी भाषेसाठी सुनेत्रा जोग यांना त्यांच्या ’अस्ताव्यस्त बायलो’ या पुस्तकासाठी पुरस्कार प्राप्त झाला. ‘साहित्य अकादमी’चे २०२३ सालचे अनुवादासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात गोव्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले पुस्तक म्हणून त्यांची निवड झाले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
नुकताच ’ब्राह्मोस एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’ या अभय सदावर्ते यांच्या अनुवादित पुस्तकाला ’साहित्य अकादमी’चा २०२३ सालचा ’उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार’ जाहीर झाला. मराठी भाषेसाठी मिळालेला हा पुरस्कार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
"धर्माला रिलीजन म्हणणे योग्य नाही. रिलीजन ही उपासनेची पद्धत आहे. त्यामुळे धर्माला इंग्रजीतही धर्मच म्हटले पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मालवा येथील 'नर्मदा साहित्य मंथन' या वार्षिक साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन यादेखील उपस्थित होत्या. (Manmohan Vaidya on Dharma)
चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तित्व घडण्यासाठी घेतले, तरच भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवार, दि. २० फेब्रुवारी रोजी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे ९७वे वर्षं. पुढील तीन वर्षांत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही साहित्य चळवळ शंभरी गाठेल. एके काळी दिग्गजांनी गाजवलेले हे व्यासपीठ आज नेमके कुठे आहे, याचा वेध घेताना संमेलनाविषयी होणारी ओरड आणि त्याची कालसुसंगतता तपासणेही तितकेच क्रमप्राप्त. त्यानिमित्ताने अमळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चा विविध आयामातून आढावा घेणारा हा लेख...
मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का?' याविषयावर आगळेवेगळे अभिरूप न्यायालय पार पडले. अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी का
सध्याच्या युगात मराठी साहित्याची आवड, मातृभाषेचा अभिमान आणि वाचन संस्कृती लोप पावल्याची ओरड सर्व स्तरातून होताना दिसते. तेंव्हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची मराठी भाषेशी, साहित्याशी, वाचन संस्कृतीशी नाळ जोडणं, अत्यंत आवश्यक वाटते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी, स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुधा मोहन वेरणेकर प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी “४थे बालकुमार मराठी साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षणाचा ध्यास असलेल्या कल्याणमधील सुप्रिया प्रकाश नायकर यांनी आठ वर्षांनंतर घर आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करीत विविध पदव्या संपादन केल्या. वेळेचे नियोजन आणि सासरकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगणार्या सुप्रिया यांच्या प्रवासाविषयी.
सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे. माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी - लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात. असा आशावाद अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला.
अनेकदा आम्हाला मोेतीबागेत व्यवस्थेसाठी यावे लागत असे. त्यामुळे घरात वावरताना जेवढे सहजपणे आपण वावरतो तेवढ्या सहजपणे मोतीबागेत वावरण्याची सवय झालेली होती. कार्यालय कितीही मोठे झाले, तरी त्या ठिकाणी माणसे जोडणारी आपुलकी तेवढीच मोठी होईल, याची खात्री आहे.
काका म्हणाले होते, “घरी येणारच तुझ्या.” पण, आता कधी हा प्रश्न सतत मनाला भेडसावत आहे. ते स्वतःच नसल्याने सगळेच अनुत्तरीतच राहिले. त्यांचा कायम हसतमुख असलेला चेहरा कायम डोळ्यांसमोर येतो. त्यांना शेवटचं पण भेटता आणि पाहता न आल्याचं शल्य कायम मनात राहील.
महाराष्ट्राची सत्वधारा असलेल्या वारकरी संप्रदायाचे भूषण, अध्वर्यू हभप बाबामहाराज सातारकर हे विठ्ठल भक्ती व प्रेमबोधाचे अत्यंत रसाळ आणि तेवढेच प्रभावी प्रवक्ते होते. निरूपणकार म्हणून ते ख्यातकीर्त होते. त्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तन कलेचा पूर्णावतार होता. ज्ञान, भक्ती, प्रेम आणि बोध यांचा अपूर्व प्रयाग संगम होता. त्यांनी अविरतपणे ६० वर्षे सातारकर फडाची धुरा सांभाळत, पंढरीच्या पायी वारीत प्रेमबोधाचे अमृतसिंचन केले. पू. बाबामहाराजांचा निकटचा सहवास आणि संवादसुखाचा भाग्ययोग लाभलेले, संतसाहित्याचे उपासक-अभ्यासक वि
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. प्रतापराव बोराडे हे महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त व जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
भूतकाळातील दुःखाचे भांडवल डॉ. धनंजय भिसे करत नाहीत. संघर्ष करत परिस्थिती पालटवत ते समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करतात. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
मुंबई : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले असून अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या संमेलनाच्या तारखासुध्दा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अमळनेर येथे दुसऱ्यांदा संमेलन भरणार असून २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हे संमेलन असणार आहे, असे साहित्य महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ साहित
साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्या अॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
डोंबिवली : “ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजांपेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळींचे काम प्रेरणा देणारे आहे, विचारांना दिशा देणारे काम आहे, ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला कृतीत आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त
साहित्य अकादमीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच प्रा. कुमुद शर्मा यांच्या रुपाने पहिली महिला उपाध्यक्ष मिळाल्या आहेत. साहित्यक्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या साहित्य अकादमीस नवा चेहरा देण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. त्याविषयी त्यांच्याशी केलेला हा विशेष संवाद...
दोन दिवसांच्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या वगाचा ओझरता आढावा या लेखात घेतला आहे. वाचकांनी त्यावरून मुस्लीम मराठी साहित्याकारांच्या मनात डोकावण्याची संधी घ्यावी. मी तर म्हणेन की दोन समाजांमधील वैचारिक दुरी कमी करण्यासाठी हिंदूंनी मराठी मुस्लीम संमेलनांना उपस्थित राहावे.
96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चपळगावकरांनी जे भाषण केले, त्यातून हाताला काय लागले आणि भविष्यात मराठी समोर भाषा म्हणून जे प्रश्न उभे राहणार आहेत, त्याची काही ठोस उत्तरे सापडली का? याचा शोध घ्यावा लागेल.
उद्या दि. ३ फेब्रुवारीपासून ते दि. ५ फेब्रुवारीपर्यंत वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संपन्न होईल. यंदा साहित्य संमेलनाला न्या. नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तेव्हा, साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साहित्यनिर्मिती आणि एकूणच साहित्य क्षेत्राबाबत न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्याशी केलेली ही खास बातचित..
दि. २८-२९ जानेवारीला नाशिकला अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक सरकारमान्य विद्वान आणि साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाच्या दोन दिवसांत पाच परिसंवाद होणार आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘मुस्लीम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि दुसरा ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर होणार आहे. हे दोन्ही परिसंवाद हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तरीही या परिसंवादात पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यांना ‘उजवे विचारवंत’- 'A
पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणाऱ्या व्यवस्थेमध्ये भरपूर दोष असून त्या दोषांचे समूळ उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे आहे.
विविध विषयांवरील वैचारिक चर्चा, कथा, माहितीचा उलगडा तज्ज्ञांनी मांडल्याने उपस्थितांना बौद्धिक आंनद झाला. ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ सोहळयात तब्बल सहा वेगवेगळया परिसंवादाच्या माध्यमातून विषय उलगडले गेले. उत्तरोत्तर वाढत जाणारा सोहळयाचा समारोप मंगळवारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत झाला.
मनोहर म्हैसाळकर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. उत्तम संघटक, व्यवस्थापक, खेळाडू, साहित्याचे जाणकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून म्हैसाळकर सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला