विदर्भ आणि मराठवाड्यातील बळीराजाच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘दिलासा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध कृतिशील उपक्रम राबविणार्या विजयाताई धस यांच्याविषयी...
Read More
हिंदू अस्मितेच्या जागृतीसाठी झपाटलेली संस्था म्हणजे नवी मुंबईची ‘सेवाभावी सामाजिक संस्था’, तसेच ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान.’ या संस्था म्हणजे राष्ट्रनिष्ठा, हिंदू संस्कृतीरक्षण आणि सामाजिक समरसतेचा संगम. ‘घर-घर जिजाऊ’पासून गडकिल्ल्यांच्या सन्मानापर्यंत ते स्वसंरक्षण प्रशिक्षणांपासून रक्तदान मोहिमांपर्यंत संस्थेचे कार्य विस्तारित आहे. या संस्था म्हणजे नव्या पिढीतील मावळ्यांची हिंदुत्वाशी निष्ठावान बांधिलकी. या संस्थांनी मिळून केलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारा हा लेख...
बांगलादेशी घुसखोरी ( Bangladeshi Infiltration ) रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून माध्यमे, नागरिक, सामाजिक संघटना यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, देशातील घुसखोरीच्या या ज्वलंत समस्येवर नेमक्या उपाययोजना कोणत्या? जबाबदार्या कशा निश्चित कराव्या? यांचा उहापोह करणार्या लेखाचा हा पूर्वार्ध...
भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला. राज्याच्या विविध भागातील महिलांचे २५ हून अधिक गट सहभागी झाले होते. प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते, व्याख्यात्या धनश्री लेले आणि अभिनेत्री दिपाली चौगुले यांनी महिलांचे कौतुक करीत कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आयोजक भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले-भोसले यांचे कौतुक केले.
मुंबई : जीवनदाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रशांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त व युनिक ब्लड मोटिव्हेटर्स च्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मैत्र दिंडी फेसबुक परिवार व रुग्णमित्र संस्था च्या सोबतीने थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजसेवी उपक्रमात 69 स्वैच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
परिवर्तक सामाजिक संस्थेच्या वतीने ६ डिसेंबर रोजी शिवाजीपार्क दादरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच स्वच्छता अभियान आणि अन्नदान उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आयोजकांनी दिली.
देव देश प्रतिष्ठान : घाटकोपर येथील एच. जे. दोषी रुग्णालयाचे संचालक डॉ. वैभव देवगिरकर आणि 'देव देश प्रतिष्ठान'चे अध्यक्ष डॉ. रविंद्र कांबळे यांनी शनिवार, दि. ३ डिसेंबर रोजी 'दै. मुंबई तरूण भारत'च्या वडाळा येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
असे म्हणतात की, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी शेवटी कडू ते कडूच! परवाच्या शरद पवारांच्या ब्राह्मण समाज संघटना प्रतिनिधींच्या भेटीचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तरही याच म्हणीत दडले आहे.
पत्रकारिता, सामाजिक कार्य, जगभ्रमण, अध्यापन आणि सामाजिक संघटन असे विविध पैलू यशस्वीपणे सांभाळणार्या ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे यांचे ‘कृष्णेचे पाणी’ हे एक शतकभरातील सामाजिक-राजकीय घडामोडींचा वेध घेत वर्तमानाला भिडणारे महत्त्वाचे आत्मचरित्र.
कोरोना संकटामुळे यंदा ‘फँड्री फाउंडेशन’ची ‘डिजिटल डोनेशन बॉक्स’ संकल्पना!
कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना 'मिलाप' संस्था मोफत साहाय्य करणार आहे.
दरवर्षी वनवासी बांधव मोठ्या जल्लोषात 'वनवासी गौरव दिवस' साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यावर भर देण्यात आला. यासाठीच वनवासी समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑबओरिजिन सामाजिक संस्था व वनवासी विकास तर्फे प्रथम राष्ट्रीय ऑनलाईन नृत्य आणि फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ऑगस्ट २०२० दुपारी ३.०० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
१० एप्रिल, १९४७ साली स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी पुढाकार घेऊन, कर्जत येथे ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ची स्थापना केली. कोरोना काळात संस्थेने महत्त्वाचे समाजकार्य केले, त्याविषयी...
कर्जत परिसरातील वनवासी बांधव, तसेच इतरही शोषित आणि अन्यायग्रस्त समाजघटकांसाठी प्रशासकीय स्तरावर आणि स्थानिक स्तरावरही कार्य करणारे यशवंत पवार यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
दि. ८ सप्टेंबर १९८५ रोजी ‘वंचित विकास’ या ट्रस्टची पुण्यात स्थापना झाली. समाजातील अपंग, रोगी व्यक्तींसाठी केलेले काम म्हणजे फक्त सेवाकार्य आहे. पण, समाजाचे घटक असूनही आपल्या अधिकारांपासून वंचित असे दलित, भटके-विमुक्त, वनवासी, वेश्या आणि सर्व समाजातील स्त्रिया या वंचित गटांसाठी काम करणार्या ‘वंचित विकास’ ट्रस्टच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा.
'सृजनशक्ती महिला संघटना' शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्यविषयक आणि स्त्रीसबलीकरणासाठी काम करते. जनजागृती करते. महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना. या संघटनेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
‘समाजसंघटन’ करणे हे तसे अवघड काम आहे. गप्पांच्या कट्ट्यावर माणसे एकत्र येणे किंवा भजन-कीर्तन ऐकण्यासाठी जनसमुदाय एकत्र येणे अथवा निवडणुकांच्या काळात नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी माणसांनी गर्दी करणे याला ‘समाजसंघटन’ म्हणता येणार नाही. एकाविशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समाजहितासाठी माणसे आपणहून एकत्र येतात, त्याला ‘समाजसंघटन’ म्हणतात.
जागतिकीकरणाच्या या युगात महिला शिक्षणाकडे वळत असल्या तरी आजही समाजनिर्बंध, तसेच आर्थिक कमतरता यामुळे स्वखर्चाकडे त्या लक्ष देत नाही. काही परिस्थितीत तर त्या आर्थिक जबाबदारी पेलण्यापेक्षा दुसर्या एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणे पत्करतात. अशा या परिस्थितीत कल्याणमधील 'रुची सामाजिक संस्थे'च्या माध्यमातून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.
लहान मुलाच्या सर्वात जवळ त्याची आई असते आणि तिचे जास्त प्रयत्न असतात ते मूल घडवण्यामागे... परंतु, पैशाअभावी किंवा अज्ञानामुळे काही महिला ते करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांना सक्षम करणे व त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वाचा विचार करून गरीब मुले व महिला यांसाठी ‘सिद्धी’ म्हणजे ‘प्रसिद्धी’ ही आपण म्हणू शकतो. ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्थे’ची स्थापना एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. नावाप्रमाणेच ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. परंतु, गरीब मुले आणि शैक्षणिक कार्यातही या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले
वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात वेगाने काम करणारी संस्था. पद्धतशीरपणे समाजात जागृती करणे, नियोजनबद्ध पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवणे हे या संस्थेंचे वैशिष्ट्य. मुंबईतील पूर्व उपनगरात या संस्थेने समाजातील सर्वच स्तरातील घटकांसाठी काम करण्याचा जणू विडा उचलला आहे. जाणून घेऊया या संस्थेबाबत...
सुरुवातीला कदम हे आपल्या कमाईतील काही ठराविक हिस्सा या मदतकार्यावर खर्च करू लागले, परंतु एका हाताची मदत कमी पडू लागल्याने त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांना या कामासाठी आवाहन केले आणि हळूहळू मदतकार्याला बरेच हात पुढे आले.
आयुष्याचे सार्थक कशात आहे? नुसते दिर्घायुषी जगण्यात आहे का? तर तसे नाही. आपले आयुष्य दिर्घ नव्हे तर कसे जगलो याला महत्व आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही समाजभान जपत समाजासाठी कार्य करत राहणे यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय हे सांगणारी सार्थक संस्था.
आजचे बालक हे उद्याचे भावी नागरिक. म्हणजे आपल्या समाजरूपी वटवृक्षाची खर्या अर्थाने मूळंच. मूळं जितकी सक्षम तितकी जास्त त्या वृक्षाची उंची. अशाच रोपट्यांना आणि वटवृक्षांना खतपाणी द्यायचे कार्य ‘आधार युथ फाऊंडेशन’ संस्था गेली सहा वर्षे करते आहे.