सामाजिक संस्थांना निधी उभारणीसाठी `मिलाप'चा पुढाकार

    16-Aug-2020
Total Views |

milap_1  H x W:


मुंबई :
कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना 'मिलाप' संस्था मोफत साहाय्य करणार आहे. विविध घटकातील वंचित वर्गासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र अशा संस्थाना बहुतांश वेळा निधीची कमतरता भासते.या संस्थांना यापुढे निधीची कमतरता भासू नये यासाठी `मिलाप'ने पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांसाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देत जास्तीत जास्त लोकांना त्यांना हवी असलेली मदत तातडीने मिळेल. ही संकल्पना भारतात प्रथमच अमलात येत असल्याची माहिती ‘मिलाप’चे सह-संस्थापक व कार्यकारी संचालक मयूख चौधुरी यांनी दिली.


आज कोरोनाच्या गंभीर परिस्थिती अनेक सामाजिक संस्था गरजू लोकांसाठी काम करीत आहेत. मात्र आर्थिक डबघाईमुळे अनेक संस्थाना देणगी व निधी उभारण्यात अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याच पार्श्वभूमीवर व्यक्तिगत कारणांसाठी निधी जमा करताना धर्मादाय संस्थांना ५ टक्के फी द्यावी लागत होती. आता या सर्व संस्थाना ‘मिलाप’च्या मोफत व्यासपीठ सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सामाजिक चळवळ उभारणाऱ्या घटकांना त्यांच्या उद्दिष्टामध्ये यश मिळावे, सुरक्षित पद्धतीने तत्काळ आणि अधिकाधिक विश्वसनीय निधी उभारता यासाठी `मिलाप’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे . ३० लाखांहून जास्त देणगीदार या व्यासपीठाचा वापर करत आहेत, असेही चौधुरी यानी सांगितले.