न्याय-हक्क लढ्यासाठी समर्थ प्रेरणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020   
Total Views |
yashwant pawar_1 &nb

कर्जत परिसरातील वनवासी बांधव, तसेच इतरही शोषित आणि अन्यायग्रस्त समाजघटकांसाठी प्रशासकीय स्तरावर आणि स्थानिक स्तरावरही कार्य करणारे यशवंत पवार यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...

जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
क्रियाविने वाचाळता व्यर्थ आहे ॥
माऊली समर्थ सांगतात त्यानुसार वागत गेले की माणसाला सत्कार्याची प्रचिती मिळते.


धाार्मिक आध्यात्मिकतेबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचा कस लावत समाजासाठी कार्य करणारे यशवंत पवार. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. समाजकारणासाठी त्यांना अनेक सन्मानही प्राप्त झाले आहेत. रायगड परिसरात वनवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. शहरीकरण, भौतिक विकास करणार्‍या योजना या परिसरात आल्या. कुठे रस्ता बनवण्यासाठी, तर कुठे विमानतळ बनवण्यासाठी वनवासी बांधवाच्या जमिनी प्रशासनाने घेतल्या. त्या बदल्यात त्यांना दुसरी जमीन मिळणे कायदेशीर आणि त्यांचा हक्कच होता. पण, कित्येक वनवासी बांधवांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात जमिनी मिळाल्याच नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंत पवार यांनी ‘जनहित’ नावाची सेवाभावी संस्था निर्माण केली. या संस्थेद्वारे वनवासी समाजाच्या जमीनहक्कासाठी त्यांनी लढा उभारला. १५ ते २० केसेस ते जिंकलेही. मात्र, प्रशासनाच्या लालफितीमध्ये त्या केसेस अजूनही गडप आहेत. बांधकाम व्यवसायात असल्यामुळे यशवंत यांचा संबंध प्रशासनाशी येऊ लागला. तिथे चालणारे अर्थपूर्ण व्यवहार ते पाहतच होते. व्यवसाय आहे, तडजोड करावीच लागते हा व्यवसायाचा नियम. पण, समर्थांच्या बैठकीत सद्गुण आणि मानवतेची पारायणे करणार्‍या यशवंत यांना याबाबत अस्वस्थ वाटत असे.

त्यातूनच मग त्यांनी वनवासी बांधवांना मदत करायचे ठरवले. कित्येक बाबतीत त्यांनी बांधवांना यशही मिळवून दिले. पण, प्रशासनातील ज्या व्यक्तींना पुराव्यानिशी गैरप्रकारांची माहिती दिली, त्यांच्यापैकी काही जणांकडून त्याचा गैरवापर झाल्याची खंतही ते बोलून दाखवतात.


यशवंत यांना लोक आदरस्नेहाने ‘माऊली’ म्हणतात. कारण, परिसरात कुणाचेही वाद, भांडणे प्रेमाने मिटवण्यात त्यांचा हातखंडा. कुणालाही योग्य सल्ला, नैमित्तिक मदत ते सढळ हस्ते करतात. नुकताच कोल्हापूर, सांगली, पुणे, शहरात पूर आला. यशवंत यांनी त्यावेळी या तिन्ही शहरातील काही गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप केले होते. आताही ‘लॉकडाऊन’मुळे जनजीवन ठप्प आहे. हातावरची पोट असलेल्यांना भाकरीही मिळत नाही. अशावेळी कर्जत परिसरामध्ये यशवंत यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. कधीकाळी वीटभट्टीचे मालक असणारे, व्यवसायाने बिल्डर असणारे यशवंत आज आध्यात्मिक आणि प्रशासकीय स्तरावर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. माहितीचा अधिकार केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अशी त्यांची धारणा आहे.

समाजासाठी प्रशासकीय स्तरावर कार्य करणार्‍या यशवंत यांची पार्श्वभूमी काय असावी तर? यशवंत हे शिंगडोल, तालुका आंबिवली जिल्हा कर्जत येथील विठ्ठल आणि रखुमाबाई पवार यांचे सर्वात मोठे पुत्र. विठ्ठल हे एका खासगी कंपनीमध्ये कंत्राटीपद्धतीवर कामाला. घरी शेती होती, पण ती नावालाच. विठ्ठल यांचा पगारही जेमतेम. त्यामुळे घरी अठराविश्व दारिद्रय. पिठामध्ये मीठ टाकून पिणे यावरच जगणे. अशा परिस्थितीमध्ये गावत चौथीपर्यंतची शाळा. त्यामध्ये त्यावेळी चौथीमध्ये फक्त यशवंतच पास झाले. पण, घरच्या गरिबीमुळे ते शिकू शकले नाही. अशातच १९७१च्या दुष्काळाने गावाचे कंबरडे मोडले. त्यावेळी यशवंत कलिंगड, भाजीपाला विक, तर कुठे मोलमजुरी कर अशी कामे करू लागले. दिवस जात होते. अशातच वडिलांच्या ओळखीचे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ होते. ते ठाण्याला राहत असत. यशवंत कामासाठी त्यांच्यासोबत ठाण्याला आले. किशोर वय, शहरातले राहणीमान, सुशिक्षित लोकांचा सहवास यामुळे यशवंत यांच्या राहणीमानात विचारांमध्ये प्रचंड फरक पडला. त्यांनाही वाटू लागले की आपण काही तरी करावे. पण, शिक्षण चौथीपर्यंतचे आणि रोजगार म्हणजे मशीन साफ करणे, लिफ्ट चालवणे, पगार महिन्याला २१० रूपये. यात काय करणार? पण यशवंत म्हणतात, “भिडे आणि गांगल या दोन व्यक्तींनी मला मोलाचे सहकार्य केले. ते दोघेही ब्राह्मण, मी त्यांच्या जातीचा ना पातीचा. पण त्यांनी मला मार्गदर्शन केले.”

अशा मार्गदर्शनातूनच यशवंत यांनी बँकेतून कर्ज घेऊन वीटभट्टी सुरू केली. पण, दुर्दैव असे की पावसाने वीटभट्टीमधील तयार विटांचे होत्याचे नव्हते केले. त्याचकाळात यशवंत यांचा विवाहही झाला होता. नवीन संसार सुरू, डोक्यावर घरच्यांची जबाबादारी. मोठ्या उत्साहाने सुरू केलेली वीटभट्टी तिच्यामुळे फायदा न होता नुकसानच झाले. पण, यशवंत डगमगले नाहीत. त्यांनी पुन्हा छोटीमोठी कामे सुरू केली. रात्रंदिवस एक केला. पै पै करून बँकेचे कर्ज फेडले. जमीन विकत घेतली. त्यातून नफा कमवला आणि बिल्डर म्हणून काम करू लागले. त्याचकाळात समर्थांच्या बैठकीमध्ये जाऊ लागले. मनशांती मिळू लागली. भली बुरी नीतिमत्ता यांचे ज्ञान आध्यात्मिक स्तरावर मिळाले. त्याचा उपयोग ते समाजाच्या कल्याणासाठी करतात. यशवंत म्हणतात, “ या सर्वासांठी मला बळ देते प्रेरणा देते ती समर्थांची उपासना...
@@AUTHORINFO_V1@@