मुंबई : घाटकोपर येथील एच. जे. दोषी रुग्णालयाचे संचालक, आणि 'देव देश प्रतिष्ठान'चे अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर तसेच डॉ. रविंद्र कांबळे (AMO ) यांनी शनिवार, दि. ३ डिसेंबर रोजी 'दै. मुंबई तरूण भारत'च्या वडाळा येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. तरुण भारत चे संपादक किरण शेलार आणि वैभव देवगिरकर यांनी आरोग्य क्षेत्रातील सद्यःपरिस्थितीवरील बऱ्याच मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. डॉ. वैभव यांनी या क्षेत्रात मुंबईतील नामांकित व्यक्तींना एकत्र करून देश व समाजाला मदत मिळवून द्यायला हवी, असे म्हणत या विषयांचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी "कृतीशिल वाचकांचे कृतीशील दैनिक मुंबई तरुण भारत नेहेमीच आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उत्थानासाठी देव देश प्रतिष्टानसोबत आहे. त्यासाठी विविध उपक्रम आणि योजना आखून त्या कार्यान्वीत करण्यासाठी मुंबई तरुण भारत प्रतिष्ठानला नेहमीच सहकार्य करेल," अशी ग्वाही देखील मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचे रुग्णालय असणे गरजेचे आहे, अशी भावना 'दैनिक मुंबई तरुण भारत आणि देवदेश प्रतिष्ठान'कडून व्यक्त करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात 'मुंबई तरुण भारत आणि देव देश प्रतिष्ठान' या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार देखील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला आहे.