परिवर्तक सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    08-Dec-2022
Total Views |

परिवर्तक सामाजिक संस्था
 
 
 
 
 
 
मुंबई : परिवर्तक सामाजिक संस्थेच्या वतीने ६ डिसेंबर रोजी शिवाजीपार्क दादरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच स्वच्छता अभियान आणि अन्नदान उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आयोजकांनी दिली.
 
 
 
कोरोना महामारीच्या संकटात या उपक्रमात दोन वर्षांचा खंड पडला होता. मात्र, संघटनेच्या व्यापक नियोजनबद्ध समर्पित नियोजनामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला. यासाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, ठाणे, विरार, नालासोपारा, सर्व मुंबई उपनगर तसेच वलसाड गुजरात येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. प्राची शिरसाठ आणि परिचारीका साक्षी मोरे यांनीही उपस्थिती दर्शविली होती. याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. संघटनेच्या वतीने लवकरच यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल विशेष प्रशस्तीपत्र आणि गौरवपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.