कोणत्याही देशासाठी त्या देशातील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा हा फार मौल्यवान घटक असतो. मात्र, गेल्या ७५ वर्षांच्या काळात देखील, भारतातील अनेक नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम नाही. याचे प्रत्यंतर अनेक घटनांमधून दिसून येत असते. त्याला निमित्त कधी क्रिकेटचा सामना असतो, कधी सण, तर कधी प्रांतीय, भाषिक अस्मिता...
Read More
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेल्या जामा मशिदीच्या (Jama Masjid) खाली मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशवदेव गौतम यांनी संबंधित मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे पुरातनकालीन असल्याचा दावा केला. याप्रकरणात त्यांनी दिवाणी न्यायधीश न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ही १५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
Uparkot Jama Masjid संभलमधील जामा मशिदीनंतर आता अलीगडमधील असलेले मंदिर-मशीद वाद समोर आला आहे. ऐतिहासिक जामा मशिदीठिकाणी मंदिर असल्याचा दावा आहे. आरटीआय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक उपरकोट हे जामा मशीद नसून ते एक मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. आरटीआयच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी मशिदीच्या ठिकाणी शिवमंदिर होते. सोमवारी त्यांनी दिवाणी न्यायाधीश न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांची याचिका मान्य करण्यात आली होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्या
Aligarh Muslim University अल्पसंख्यांक दर्जा अबाधित राहील. एएमयु हा दर्जा पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा दर्जा केवळ कायद्याअंतर्गत तयार करण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाने हा निर्णय शुक्रवारी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला होता.
modi rally in aligarh - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये विशाल जनसभेला संबोधित केले. याच दरम्यान, यापूर्वी अलीगढ भेटीबद्दल आठवणी सांगितल्या, त्यावेळी काँग्रेसची घराणेशाही- भ्रष्टाचार व तृष्टीकरणाच्या फॅक्टरीला टाळे ठोकण्याचे आवाहन जनतेला केले होते. मोदी म्हणाले, "मतदारांनी ही गोष्ट इतकी मनावर घेतली की आजपर्यंत दोन्ही युवराजांना चावी मिळत नाहीये."
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इसिस मॉड्युलप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. एटीएसने अमास उर्फ फराज अहमद आणि अब्दुल समद मलिक या दोघांना अटक केली आहे.
मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी हा आरोप १२वीत शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यावर लावण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थी 'अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी'मध्ये (AMU) शिकतो आणि स्वतःला नास्तिक म्हणवतो. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना मंगळवारी (12 डिसेंबर 2023) घडली.
उत्तर प्रदेशमधील ‘अलिगढ’ शहराचे नाव बदलून ‘हरिगढ’ करण्याचा प्रस्ताव अलिगढ महानगरपालिकेत मंजुर झाला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्यात आला असून त्यांच्या मंजुरीनंतर नाव बदलले जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली गुलामगिरीची चिन्हे पुसून टाकण्यास प्रारंभ झाला आहे.
२००२ मध्ये १४ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी अलीगढ पोलिसांनी आरिफला अटक केली आहे. पीडित तरुणी मूळची अलीगढची आहे. पीडितेने आग्रा येथे काम करत असताना त्यांनी यूपीचे पोलीस अधिकारी राजीव कृष्णा यांना आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला होता. त्याच्याकडून हिंमत मिळाल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये या हल्ल्याबाबत पीडितेने एफआयआर दाखल करण्यात आला. हा खटला अलीगढ येथे वर्ग करण्यात आला आणि २७ ऑक्टोबर रोजी आरिफला पकडण्यात आले.
उत्तर प्रदेशातील ‘अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU)’ च्या बेगम अजिजुनिशा हॉलमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींना जेएन (जवाहरलाल नेहरू) मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 'सर सय्यद डे'च्या दिवशी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. आजारी असलेल्या विद्यार्थिनी अब्दुल्ला गर्ल्स कॉलेजच्या आहेत. गुलिस्तान-ए-सय्यद येथे 'सर सय्यद डे'च्या दिवशी
इस्रायलवरील ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही मुस्लीम राष्ट्रांत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला गेला, तर इकडे उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम विद्यापीठात इस्रायलविरोधी घोषणाबाजी करुन ‘हमास’च्या समर्थनाचे नारे लागले. ‘हमास’च्या क्रूर हिंसाचारानंतर देशविदेशातील मुस्लीम उम्माला आलेली ही उबळ ही समस्त जगासाठीएक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने पकडले आहे. फैजान अन्सारी उर्फ फैज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला झारखंडमधील लोहरदगा येथून अटक करण्यात आली आहे. तो भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता.
नवी दिल्ली : गाझियाबाद – अलिगढ द्रुतगती महामार्गावर विक्रमी १०० तासांमध्ये १०० मार्गिका किमी अंतरावर बिटुमिनस काँक्रीटीकरण (डांबरीकरण) पूर्ण करण्यात आले आहे. याद्वारे ङारताच्या पायाभूत सुविधा उद्योगाची गती आणि प्रगती अधोरेखित झाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
वास्तविक दहेलवीच्या पारंपरिक दृष्टिकोनाला आधुनिक काळाशी काही प्रमाणात सुसंगत करण्याचा अहमद खान यांनी प्रयत्न केला. वहाबी पंथांचे तत्वज्ञान आधुनिक विचारांच्या वेष्टनात गुंडाळून इतर धर्मीयांच्या शोधक दृष्टीपासून, या हालचाली दूर ठेवण्यासाठी घेतलेला हा एक पवित्रा होता असे म्हणावे लागते.
उत्तर प्रदेशच्या अलीगढ भागात नीलांचल एक्सप्रेसमध्ये धक्कादायक दुर्घटना उघडकीस आली आहे. रेल्वे रुळावर पडलेला एक रॉड सरळ रेल्वेची खिडकी तोडून थेट प्रवाशाच्या मानेत घुसला आणि डोक्याचा भाग फाडून बाहेर आला. दरम्यान, या दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रेल्वे ताशी ११० किमी वेगाने जात होती. ही दुर्घटना डाबर-सोमना रेल्वे स्थानकादरम्यान झाली. या दुर्घटनेनंतर बोगीत हाहाःकार माजला होता. प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. नेमका प्रकार काय घडला हे काहीकाळ कळलेच नाही.
कर्नाटकात सुरु झालेले हिजाब वादाचे लोण आता देशभर पसरायला लागले आहे. उत्तरप्रदेश मधील अलिगढ विद्यापीठात तर कोलकात्यातील आलिया विद्यापीठात बुधवारी हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने झाली
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाल्याने अनेक भाविकांकडून श्रध्देपोटी निरनिराळ्या गोष्टी मंदिरासाठी अर्पण केल्या जात आहेत. ज्वालापुरी येथे राहणाऱ्या सत्यप्रकाश शर्मा या ६५ वर्षाच्या व्यक्तीकडून एक भव्य कुलूप बनवण्यात आले आहे.
भारतीय जनचा पक्षाचे नेते डॉ. निशित शर्मा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी संदर्भात पत्र लिहीले असून इयत्ता अकरावीसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेत इस्लाम अभ्यासाच्या अनिवार्यतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने आपला छळ होत असल्याचा आरोप विद्यार्थी दानिश रहीमने केला आहे. त्याला विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे. त्याने पंतप्रधानांकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मृतांमध्ये १९ प्राध्यापक तर २५ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश
शरजिल उस्मानीने ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे झालेल्या 'एल्गार परिषदेत' हिंदू समाजाविरोधात विष ओकण्याचे घृणास्पद कृत्य केल्याबद्दल त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात अॅड. प्रदिप गावडे यांनी सोमवार, १ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. शरजिल उस्मानीवर धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या भावना दुखावणे, एखाद्या समाजाला भडकावणे आदी गंभीर स्वरुपाचे आरोप लावण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेला मुरड घालून मोदींनी, विविध मुस्लीम देशांतील एक हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत असलेल्या अलिगढ विद्यापीठात संवाद साधला, असा विचार करणे उथळपणाचे ठरेल. नरेंद्र मोदींच्या अलिगढमधील भाषणाची प्रासंगिकता समजून घ्यायची असेल, तर अलिगढचा इतिहास आणि उम्मा, म्हणजेच मुस्लीम जगताची सद्यःस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. या समारंभात पंतप्रधान एका टपाल तिकिटाचेही प्रकाशन करणार आहेत. या विद्यापीठाचे कुलगुरू महामहिम सैदाना मुफद्दल सैफुदीन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल नि:शंक हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
अलिगढच्या भुजपुरा येथे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर वेळेत देण्यात आलेली शिथिलता संपल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला
निदर्शकांनी गेल्या ४८ तासांपासून मुरादाबाद - अनुपशहर महामार्ग रोखून धरला
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात अलीगढमध्ये केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा पर्दाफार्श करण्यात उत्तर प्रदेश पोलीसांना यश आले आहे. एका महिलेने जेवण आणि पैशांच्या आमिषापोटी मला आंदोलनाला पाठवण्यात आले होते, अशी कबुली पोलीसांना दिली आहे.
वर फास्टफूड विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे वर्षाला उत्पन्न किती असेल याचा अंदाज तुम्ही सहज बांधू शकाल मात्र, उत्तर प्रदेशातील अशाच एका व्यापाऱ्याने आयकर विभागातील अधिकाऱ्यांनाही चक्रावून सोडले आहे. अलीगडमध्ये एका सिनेमागृहाजवळ कचोरीचा स्टॉल लावणाऱ्या मुकेशची कमाई वर्षाला ७० लाख ते कोटीच्या घरात आहे. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर द्वेष, उद्विग्नपूर्ण भावनांना वाचा फुटते. पण, अवघ्या काही दिवसांत विरोधाचे हे सूर मावळतात.
उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुरडीची १० हजार रुपयांचे कर्ज न चुकवल्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही बातमी समोर येताच सर्व क्षेत्रातील लोकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठामध्ये भारतविरोधी नारे लावणाऱ्या आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या काही सापांची पिलावळही तयार होते.
महात्मा गांधी यांच्या स्मतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर पिस्तुलने गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची कार्यकर्ती पूजा पांडेला अटक
आपण केलेल्या देशविरोधी कृत्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य वा तत्सम भंपकपणामुळे मिळणारा पाठिंबा व ‘कोणीतरी आपल्यामागे उभे राहणारे’ असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या मनात काहीही केले तरी काही बिघडणार नसल्याची हिंमत निर्माण झाली. यातूनच देश, राष्ट्र व राष्ट्रीय अस्मिता-प्रतिकांनाच सुरुंग लावण्याचे डाव आखले गेले. आताचे अलीगड मुस्लीम विद्यापीठातील प्रकरणही त्यातलेच.
मन्नान बशीर वानी हा ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या संघटनेचा कुपवाडाचा कमांडर होता. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता
भारतात राहायचे आणि गोडवे पाकिस्तान निर्मात्याचे गायचे, हे आणखी किती काळ खपवून घेतले जाणार आहे? ही कीड वेळीच नष्ट न केल्याने तिने उग्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे.
अस्मिता, अभिमान, गर्व या गोष्टीच एखाद्या समाजाला वा राष्ट्राला आपल्या अस्तित्वाची ओळख देत असतात. त्या ओळखीची प्रतिके तयार होत असतात.