लखनौ : उत्तर प्रदेशातील ‘अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU)’ च्या बेगम अजिजुनिशा हॉलमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींना जेएन (जवाहरलाल नेहरू) मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 'सर सय्यद डे'च्या दिवशी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. आजारी असलेल्या विद्यार्थिनी अब्दुल्ला गर्ल्स कॉलेजच्या आहेत. गुलिस्तान-ए-सय्यद येथे 'सर सय्यद डे'च्या दिवशी या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमासाठी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथकही एएमयूमध्ये पोहोचले आहे. वसतिगृहाचीही चौकशी सुरू आहे. रात्री १.३० वाजता अचानक विद्यार्थिनींना उलट्या आणि पोटदुखीची तक्रार सुरू झाली. या सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रमातच जेवण केले. या सर्वांवर जेएन कॉलेजमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आकडेवारीवरीनुसार , ३०० हून अधिक मुली आहेत ज्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सकाळपासूनच हॉस्पिटलमध्ये मुली येण्यास सुरुवात झाली होती आणि दिवसअखेर हा आकडा ३०० च्या वर पोहोचल्याचे रुग्णालयाने सांगितले. मात्र, अनेकांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ.हारिस मंजूर खान यांनी ही माहिती दिली.
बेगम अजिजुनिशा हॉल हे AMU चे वसतिगृहात आहे. ज्यामध्ये १५०० मुलींना राहण्याची क्षमता आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने वसतिगृहातील जेवणाचे ठिकाण आणि स्वयंपाकघरातील अन्नाचे नमुने घेतले असून, जे खाल्ल्यानंतर मुली आजारी पडल्या. विद्यापीठाने ३ सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे. विद्यापीठाची विद्यार्थी संघटना अमुतानेही याबाबत बैठक घेतली. सर सय्यद अहमद खान हे AMU चे संस्थापक होते, जे स्वतंत्र मुस्लिम देशाच्या निर्मितीच्या बाजूनेही होते.