अलीगढच्या सभेत तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार
22-Apr-2024
Total Views | 93
अलीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये विशाल जनसभेला संबोधित केले. याच दरम्यान, यापूर्वी अलीगढ भेटीबद्दल आठवणी सांगितल्या, त्यावेळी काँग्रेसची घराणेशाही- भ्रष्टाचार व तृष्टीकरणाच्या फॅक्टरीला टाळे ठोकण्याचे आवाहन जनतेला केले होते. मोदी म्हणाले, "मतदारांनी ही गोष्ट इतकी मनावर घेतली की आजपर्यंत दोन्ही युवराजांना चावी मिळत नाहीये."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "चांगल्या भविष्याची आणि विकसित भारताची किल्ली ही जनतेकडेच असेल. आता देशात गरिबी पूर्णपणे मुक्त करण्याचा आणि देशातून घराणेशाही संपविण्याची वेळ आली आहे. देशाच्या पुढे कुठलीही मोठी गोष्ट नाही, त्यामुळे तुम्ही निवडणूकीत सर्व कामे बाजूला ठेवून मतदान करा. सकाळी ऊन सुरू होण्यापूर्वी आणि नाश्ता व जलपान करण्यापूर्वी तुम्ही मतदानाला या.", असे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते.
कलम ३७०च्या नावाखाली जम्मू काश्मीरात फुटीरतावादी मोठ्या शानशौकीत रहायचे. आपल्या लष्करावर हल्ला करायचे. आपल्या सैनिकांवर दगड फेकायचे. आता मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यापूर्वी दंगली, हत्या, गँगवॉर, वसूली तर समाजवादी पक्षांच्या सरकारांसाठी ट्रेडमार्क होती. मात्र, काळ बदलला आता योगी सरकारच्या काळात गुन्हेगारांची मान वर करुन पहाण्याची हिम्मत होत नाही. सर्वसामान्यांच्या आय़ुष्यात कुठलीही दखल देण्याची चूक ते करत नाहीत."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित मुस्लीम बांधवांशीही संवाद साधला. ते म्हणाले, "यापूर्वी हज यात्रेत कोटा होत असल्याने यात्रेला जाण्यासाठी मारामारी होत होती. त्यातही भ्रष्टाचार बोकाळला होता. त्यामुळे ज्यांची ऐपत होती तेच हज यात्रेत जाऊ शकत होते. मात्र, मी सौदीच्या क्राऊन प्रिंसला आग्रह केल्यानंतर त्यांनी भारताचा हज कोटाही वाढवला. वीसा नियमनही शिथील केले. पूर्वी हजसाठी मुस्लीम माता-भगिनींना एकट्याने जाण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता त्यांना ही परवानगी मिळाल्याने त्या मला आशीर्वाद देत आहेत."
मोदी पुढे म्हणाले, "काँग्रेस आणि सपा सारख्या पक्षांनी केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. त्यांनी मुस्लीमांच्या राजकीय आणि सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी काहीच केले नाही. पण मी जेव्हा पसमांदा मुस्लीमांच्या संकटांबद्दल वेदनांबद्दल बोलू लागते तेव्हा त्यांचे चेहरे सुतकी होऊ लागता. त्यांनी पसमंदा मुस्लीमांना अशाच स्थितीत सोडले पण मलाई खायला ते विसरले नाहीत. जनतेच्या पैशांना लुटणे हे काँग्रेस आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे समजते."
राहुल गांधींबद्दल बोलताना मोदींनी चांगलाच प्रहार केला. राहुल गांधींच्या सपत्तीच्या वाटणीबद्दलच्या वक्तव्याबद्दल त्यांनी समाचार घेताना म्हटले की, "राहुल गांधींची नजर आता माता भगिनींच्या मंगळसुत्राकडे आहे. त्यांचे स्त्रीधन चोरण्याचा मनसूबा गांधींचा आहे. जातीय सर्वेक्षणाद्वारे कुणाचे उत्पन्न किती, कुणाच्या ठेवी किती, कुणाच्या गाड्या किती या सगळ्याच्या हिशोब काँग्रेसला ठेवायचा आहे. त्यावर डल्ला मारण्याचा मनसूबा काँग्रेसचा आहे.", असा आरोप मोदींनी केला.
याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीगढच्या डिफेन्स कॉरिडोअर निर्माणचा उल्लेख केला. ज्यात ब्रम्होस मिसाईल तयार केला जाणार असून आम्हाला गर्वच असेल, असेही मोदी म्हणाले. "अलीगढचे टाळे, हातरथचे हिंग, मेटल कार्पेट उद्योग भाजप सरकार प्रत्येक उद्योगाची तादक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. इंडी आघाडीतील नेते इतके नैराश्यात आहेत की त्यांच्याकडे भविष्य पहाण्याची त्यांच्याकडे ना क्षमता आहे ना उत्साह राहिला आहे. आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला आम्ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहोत. ही लोकं फक्त स्वतःच्या कुटूंबासाठी आणि जनतेच्या छळासाठी राजकारणात आली आहेत.", असेही मोदी म्हणाले.