नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमानाची दोन आसनी प्रशिक्षणार्थी आवृत्ती आज राजस्थानातील चुरू जिल्ह्याजवळ कोसळले.
विमानाने सुरतगड हवाई तळावरून दोन वैमानिकांसह उड्डाण केले होते. या घटनेनंतर, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातस्थळी पाठवण्यात आले आहेत, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलातर्फे याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राजस्थानमधील चुरूजवळ आज नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आयएएफच्या जग्वार ट्रेनर विमानाला अपघात झाला. या अपघातात दोन्ही वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आयएएफला जीवितहानीबद्दल तीव्र दुःख आहे आणि या दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) स्थापन करण्यात आले आहे.