अलिगढ : अलिगढच्या भुजपुरा येथे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर वेळेत देण्यात आलेली शिथिलता संपल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. हल्लेखोरांनी पोलिसांच्या दुचाकीची तोडफोडही केली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीवर नियंत्रण आणले.
दरम्यान लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी वेळ ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार हा वेळ संपताच भाजी विक्रेते परतत होते. यावेळी दोन भाजीविक्रेत्यांमध्ये भांडण सुरु झाले. बंदोबस्तासाठी असणारे पोलीस याठिकाणी पोहोचताच त्यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी भाजी विक्रेते व जमावाने पोलिसांवर दगडफेक करत हल्ला चढविला. संबंधित घटनेत जुनैद नामक पोलीस हवालदार जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी पांडे यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर आरोपींची ओळख पटवली जात असून त्यांना अटक करण्यात येईल.