अलीगढ मुस्लिम विद्यापीठाबाबत सुप्रिम कोर्टाचा निर्णय
08-Nov-2024
Total Views |
उत्तर प्रदेश : अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा (Aligarh Muslim University) अल्पसंख्यांक दर्जा अबाधित राहील. एएमयु हा दर्जा पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा दर्जा केवळ कायद्याअंतर्गत तयार करण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाने हा निर्णय शुक्रवारी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केला असल्याचे वृत्त आहे.
सुप्रिम कोर्टाने दिलेल्या या निर्णयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय जारी केला आहे. या निर्णयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह ४ न्यायाधीश चंद्रचूड यांच्या समर्थनार्थ होते, तेव्हा ३ न्यायाधीशांनी त्यास असहमती दर्शवली होती.
या निर्णयासोबत आता सर्वोच्च न्यायालयाने १९६७ चा आपला जुना असलेला निर्णय रद्द केला आहे. १९६७ साली सुप्रिम कोर्टाने म्हटले होते की, या संस्थेला अल्पसंख्यांकांचा दर्जा देता येणार नाही. कारण ती संस्था एका कायद्यानुसार तयार करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अल्पसंख्यांक हा एक मुद्दा खंडपीठाकडे जारी केला होता. जे ठरवले गेले होते ते आता अल्पसंख्याकांसाठी स्थापित करण्यात आले. या आधारावर हा निर्णय घेण्यात आला असे न्यायालयाने सांगितले आहे.