नवी दिल्ली : भारतीय जनचा पक्षाचे नेते डॉ. निशित शर्मा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी संदर्भात पत्र लिहीले असून इयत्ता अकरावीसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेत इस्लाम अभ्यासाच्या अनिवार्यतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही अनिवार्यता दूर व्हावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केल्याचे समजते.
प्रवेश प्रक्रीयेत इस्लाम अभ्यासाची अनिवार्यता म्हणजे बेकायदेशीरपणे इस्लाम लादण्याचा प्रकार आहे. विज्ञान आणि वाणिज्य विषयाच्या प्रवेशासाठी इस्लाम अभ्यासाशी संबंधीत अकाद/इबादत, सीरत-ए-रसूल-ए-अक्रम, कुराण आणि हदीस, भारतातील मुस्लिमांचा इतिहास, औरंगजेब, टिपू सुलतान अशा अनेक प्रश्नांसाठी १० गूण अनिवार्य असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 'अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत निरनिराळ्या धर्मातील मुलांकडून प्रवेशासाठी अर्ज केला जातो. इस्लामिक अभ्यासक्रम अनिवार्य करणे हे भारताच्या संविधानाविरूध्द असून इतर धर्मातील मुलांवर इस्लाम लादण्याचा हा प्रकार आहे," असे देखील ते म्हणाले.