मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणारेनाशिक येथील ‘जागर मनाचा’ संस्थेचे संस्थापक शंतनू श्रीरंग गुणे यांच्याविषयी...
Read More
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. एरवी इंग्रजी नववर्षाच्या स्वागतापूर्वी अनेकांकडून विविध संकल्प सोडले जातात. तसेच हिंदू नववर्षारंभीही वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी नवसंकल्पाची गुढी उभारायला हवी. हे नवसंकल्प केवळ वैयक्तिक, कौटुंबिक अथवा सामाजिक हिताचेच नाही, तर यात व्यापक राष्ट्रहिताचा संदेशही अनुस्यूत आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंद हरवत चाललेला आहे. अशा वेळी आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी ‘तेजज्ञान’ ( Tejgnyan ) संस्था कार्यरत आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...
Happy Children Day नुकताच बालदिन साजरा झाला. खरं तर बालपण हे खेळण्या-बागडण्याचे वय. पण, काही मुले या खेळण्या-बागडण्याच्या वयातही उंच भरारी घेतात, की ज्यामुळे कायमच त्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि आश्चर्यही वाटते. अशाच विविध क्षेत्रांत बालवयातच आपला ठसा उमटविणार्या बालवीरांचा बालदिनानिमित्ताने हा अल्पपरिचय...
कल्याणमध्ये वूमेन्स फोरम निमा कल्याण यांच्यातर्फे 'निमा वेदा ग्लॅम 2024' ब्रेन अॅण्ड ब्युटी काॅन्टेस्ट ही महिला डॉक्टरांची सौंदर्य स्पर्धा आणि "आनंदी" ही राष्ट्रीय वैद्यकिय शिक्षण परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली.
अंधत्व असूनही जिद्दीने आत्मसात केलेल्या इलेक्ट्रॉनिकविश्वातल्या तंत्राचे धडे इतर अंधबांधवांना देत, त्यांना स्वावलंबित्वाची दूरदृष्टी प्रदान करणार्या सागर पाटील यांची ही प्रेरणादायी कहाणी...
आयुष्याच्या उतारवयात साथसोबत आवश्यक असणार्या ज्येष्ठ नागरिकांना ‘लिव्ह इन’चा आगळावेगळा आधार देणार्या ‘हॅपी सिनिअर्स’ या संस्थेच्या माधव दामले यांच्याविषयी...
जिथे राम नाही त्या ठिकाणी काम, आसक्ती, स्वार्थ, अहंकार हे विकार राहायला येतात. अशा कामकारी विकारी माणसाला भगवंताविषयी आदर, प्रेम, भक्ती वाटणे सुतराम शक्य नाही. असे स्वामींनी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे. कामविकार आलेल्या मनात राम राहत नाही. त्यामुळे ते मन प्रसन्न, आनंदी राहत नाही.
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातून रविवारी दि. ११ सप्टेंबर रोजी विहरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्वरित कारवाई करून या बिबट्याला वाचवण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणी केल्यानंतर या बिबट्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे.
आपल्या घरात आपण साफसफाईसाठी वेगवेगळी प्रॉडक्ट्स वापरतो. फिनेल, तसेच निरनिराळी डिटर्जन्ट्स याचा त्यामध्ये समावेश होतो. पण, यातील किती उत्पादने प्रत्यक्षात फायद्याची असतात? हा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का?आणि पडला नसेल तर तो आज यानिमित्ताने जरुर पडायला हवा. कारण, या उत्पादनामध्ये वापरल्या गेलेल्या केमिकल्सनी आपल्याला अपाय होऊ शकतो. पण, जर आपल्याला हीच उत्पादने पर्यावरणपूरक आणि कुठलाही धोका नसणारी अशा स्वरुपात उपलब्ध झाली तर ती आपल्यालाही नक्की आवडतील. अशीच पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करणार्या ‘स्विफ्टी’
ग्रामपंचायतीच्या कार्यालयातला निर्णय हा एखाद्या व्यक्तीच्या घरातला निर्णय नसतो. पतीच्या मृत्यूनंतर घरातून बेदखल होताना अनेक महिलांना पाहिले आहे. कुंकू, मंगळसूत्र बांगड्यापेक्षा तिला जगण्याचा विषय महत्त्वाचा असतो. हेरवाड आणि प्रशासनाने संपूर्ण ग्रामपंचायतींसाठी परिपत्रक काढले. हे विधवांच्या सन्मानजनक जगण्यातले पहिले पाऊल आहे असे म्हंटले जाते. मात्र, कुटुंबाच्या मनातला या संदर्भातला परिपत्रक कसा बदलणार?
२००० वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल यांनी आनंदाबद्दल एक छान मत उद्घोषित केले होते. आनंदात आयुष्याचा अर्थ आणि हेतू आहे. आनंद हे आयुष्याचे परिपूर्ण ध्येय आहे आणि मानवी अस्तित्वाचे निष्कर्ष आहे.
“ज्येष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीचे काम पाहून मला कार्य करण्याची ऊर्जा मिळते,” असे प्रतिपादन कल्याणचे भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवार, दि. १६ ऑगस्ट रोजी केले. ज्येष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीने कल्याण शहरातील राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ सेवा मंडळाच्या सभागृहामध्ये ‘आनंदी संध्याकाळ’ सन्मानपत्र वितरण करण्यात आले. या सोहळ्यामध्ये पवार बोलत होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचे राजे, स्वराज्याचे शिल्पकार. शिवाजीराजे, शिवबा, शिवबा राजे, शिवराय अशा अनेक नावांनी शिवाजी महाराज ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. महाराजांचा पराक्रम आणि शिवकालीन इतिहास जनसामान्यांना खूप चांगला माहीत आहे. त्यामुळे इतिहासातील काही ठळक गोष्टी पाठशाळांमधील मुलांना कळाव्यात, या हेतूने शाळेत ‘शिवजयंती’ साजरी करण्यात आली. शिवजयंती सोहळा ‘हॅप्पीवाला’ म्हणजे नक्की कसा! याचीच माहिती या लेखात वाचायला मिळणार आहे.
‘इस्लाम खतरे में’ची बांग देणार्या अन्सारींना त्याचे पुरावे काय, असे विचारल्यावर मुद्देसूद उत्तरही देता आले नाही. अखेर उत्तरच नसलेल्या अंगावर येणार्या प्रश्नांमुळे बोबडी वळालेल्या हमीद अन्सारी यांना चक्क मुलाखत अर्धवट सोडून पळ काढावा लागला. जणू काही प्रश्नांच्या तोफगोळ्याने अन्सारींच्या अंतर्मनातला ‘कट्टर मुसलमान’ घाबरला आणि तिथून निघून गेला.
संकल्प पाळायचा असेल तर तो नवी आशा, नवा उद्देश, नवा उजेड, नव्याची आस, नवे प्रेम, नवी मैत्री, नवीन नाती, नवीन आठवणी हे सगळे गुण हृदयाच्या एका कुपीत जपून ठेवत वर्षभर त्याचा सुगंध पसरत राहील आणि याने वर्षभर तो दरवळत राहील, यासाठी कायम तत्पर असायला हवे
नववर्षाच्या निमित्ताने जमाखर्चाचे हिशेब करताना व्यक्तिगत विचार न करता, ज्या समाजाचे आपण एक अंग आहोत त्या समाजाचा, देशाचा विचार करणे अगत्याचे आहे. थेंब-थेंब पावसानेच नद्या, तलाव, समुद्र प्रवाहित होतात. प्रत्येक थेंबाला सारखेच महत्त्व असते. केवळ शहरे ‘स्मार्ट’ झाल्याने देश ‘स्मार्ट’ होत नाही. खेड्यांचे, छोट्यामोठ्या गावांचेही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना जास्त महत्त्व आहे.
ही कथा आहे हेमंतकुमार वामन वाघ या एका मध्यमवर्गीय मराठी तरुणाच्या ‘सुखसंपन्न जीवन ते संन्यस्त कर्मयोगी जीवन’ या प्रवासाची...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. प्रवीण दरेकर यांचा आज वाढदिवस. सहकार चळवळीत त्यांच्यासोबत कार्य केलेला कार्यकर्ता तसेच विधिमंडळातील त्यांचा सहकारी म्हणून गेली अनेक वर्षे मी त्यांचे काम जवळून पाहत आहे. विधिमंडळात तसेच रस्त्यावर विविध प्रश्नांवर आमदार म्हणून आवाज उठविणारे हे जनसामान्यांतील नेतृत्व आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहे. विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे माणसांच्या आश्रमांना भेटी थांबल्याने तिथे मिळणारी मदतदेखील कमी येऊ लागली. तरी आश्रमातील चिमुकल्यांना आणि वृद्धांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी चाललेल्या धडपडीला यश येऊन गेल्या तीन महिन्यांमध्ये टीम ‘हॅप्पीवाली फीलिंग’च्या माध्यमातून एकंदरीत अकरा आश्रमांमध्ये अन्नधान्याच्या साधन सामग्री वाटप पार पाडले गेले.
सुरुवात करतोय 'संडे फंडे'पासून. पहिल्यांदा तर तुम्हाला 'संडे का फंडा' नक्की काय, ते मोजक्या शब्दात सांगतो. महिन्यातला एक रविवार कोणत्याही एका वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जायचं आणि तिथे वयोमानानुसार नियोजित करमणुकीचे निरनिराळे खेळ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसोबत खेळायचे. सोबत हास्यविनोदाने प्रत्येकाच्या गालावर हसू उमटवायचे. छोटीशी 'खाऊ पार्टी' करायची आणि अशा प्रकारे त्या 'संडे'ला 'फंडे' बनवून टाकायचे. या पद्धतीने टीम 'हॅप्पीवाली फीलिंग'ने आजवर पाच 'संडे फंडे' विविध संस्थांमध्ये साजरे केले. या मागचा उद्
‘रंगभूमी’च्या सेवेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्या चेतना मेहरोत्रा हिच्या संघर्ष आणि जिद्दीचा हा प्रवास. ‘रंगभूमी : ए हैप्पी प्लेग्राऊंड’च्या माध्यमातून हजारो कलाकार घडविणार्या तिच्याबद्दल...
आपण अनेकदा पाहतो मॉल, चित्रपटगृह आणि गार्डनच्या बाहेर अनेक चिमुरडी आपले बालपण बाजूला ठेवून काम करत असतात आणि आपण कधीच आतमध्ये जाऊन यांचा अनुभव घेऊ शकणार नाही, असे म्हणत निराश होऊन जगत असतात. पण अशाच चिमुकल्यांना या बालपणाच्या आनंदावर तुमचादेखील हक्क आहे, या आशेचा किरण दाखवणारा अनोखा उपक्रम अशा मुलांसोबत मुंबईत साजरा करण्यात आला.
या सीरीजच्या पुढच्या पार्टमध्ये काय होणार? दुसरा सीजन नेमका कधी येणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
हिंदी चित्रपटसृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार, त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत.नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा त्यांना एक खास व्हीडिओ पाठवून शुभेच्छा दिल्या.
अगदी बरोबर वाचलतं. मुंबईतील 'हॅप्पीवाली फिलिंग' नावाचा १४ जणांचा समूह पूरग्रस्त भागात मदत करणे, हे आपले कर्तव्य समजून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज या भागात जीवनावश्यक वस्तूंच्या ७५० पाकिटांचे वाटप करत शुक्रवार ते रविवार दिवसभर घरोघरी किटरुपी 'हॅप्पीवाली फिलिंग' पसरवत होता.
एकीकडे रुपाली अन तिच्या कुटुंबाला हवी होती तशी बर्थडेपार्टी झाली. दुसरीकडे लक्ष्मी अन तिच्या कुटुंबाला आमच्या गोड कंपनीसोबत खाऊ आणि मच्छरदाणी मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांनाच ‘रिटर्न गिफ्ट’रुपी मिळाली ‘हॅप्पीवाली फिलिंग.’
एकीकडे कितीही अडचणींना सामोरे जावे लागले तरी खुल्या मनाने जगणारी माणसं, तर दुसरीकडे अगदी क्षुल्लक कारणांसाठी लोकांच्या जीवावर उठणारी माणसंही कमी नाहीत
उत्तर प्रदेशात कारवाईनंतर काही नेत्यांना पक्षात पुन्हा स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘चला, होळीच्या रंगात थोडा आनंद मिसळूया! यंदाची होळी ‘हॅप्पीवाली’ होळी साजरी करूया!‘ हे ब्रीदवाक्य घेऊन एक उपक्रम मी आणि माझ्या ‘हॅप्पीवाली फीलिंग’च्या टीमने राबवायचा ठरवला.
२० मार्च या आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या (युएन) जागतिक आनंद अहवालानुसार, आपणा भारतीयांचा आनंदी आणि सुखी जीवनाच्या या यादीत तब्बल १४०वा क्रमांक लागतो
विद्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...
खूप बरं वाटतं आहे आणि सांगायला आनंदही होतो आहे की, कळत-नकळत लोकांमध्ये ‘HappyWali Feeling’ वाढते आहे आणि ती वाढण्यासाठी मदतीचे नि:स्वार्थहात पुढे सरसावू लागले आहेत.
केशव स्मृती सेवासंस्था समूह संचलित आश्रय माझे घर या प्रकल्पात रक्षाबंधन उत्सव रविवारी अनोख्या उत्साहात पार पडला. गर्दी व भेटवस्तू, कौतुकभरल्या आणि प्रेममय नजरेने बांधलेल्या राख्या यामुळे ही मुलं साहजिकच आनंदून गेली होती.
आपल्याला सर्वसामान्यपणे आनंद केव्हा होतो, जेव्हा आपले इप्सित साध्य होते. आपल्याला यश मिळते. आपली ऐहिक स्वप्ने पूर्ण होतात. योग्य वेळी योग्य गोष्ट होते. एकूण काय, आपल्याला हवे असलेले ते आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा आपले मन सुखावते.
क्रिकेटचा देव म्हणून मानला जाणारा महाराष्ट्राचा आणि देशाचा लाडका खेळाडू सचिन तेंडूलकर अर्थात ‘तेड्ल्या’ याचा आज ४५ वा वाढदिवस आहे.
उद्यापर्यंत होईल का हा संकल्प पूर्ण?