स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |


भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला आहे. लता मंगेशकर यांनी छत्तीसपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायचा विक्रम केला आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशाद्वारे त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संध्याकाळी प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या लता मंगेशकर यांच्या छायाचित्रांच्या संकलनाचे लोकार्पण केले. तर नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा त्यांना एक खास व्हीडिओ पाठवून शुभेच्छा दिल्या.

लता दीदींनी आपल्या मधुर आवाजाने आणि सौम्यतेने सर्व देशवासीयांना केवळ मंत्रमुग्ध केलेच पण त्याचबरोबरीने संपूर्ण जगामध्ये भारत देशाचा अभिमानही वाढविला असल्याचे शाह यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@