
हिंदी चित्रपटसृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार, त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन हे सिने सृष्टीचा प्राण आहेत त्यामुळे त्यांच्याप्रति असलेला आदर हा साहजिक आहे.
१९६९ साली 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर मागे वळून पहिलेच नाही. ७० च्या दशकात त्यांच्या चित्रपटांमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ते 'अँग्री यंग मॅन' या नावाने प्रचंड लोकप्रिय झाले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण हार न मॅनटा आपल्या वडिलांच्या तत्वांचे अवलंब करून त्यांनी आपल्या आयुष्यात यशाची अनेक शिखरे गाठली. आजही ते त्याच उत्साहाने चित्रपटांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देत आहेत.
अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कार आणि नुकताच चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील त्यांना जाहीर झाला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या जात आहेत.
T 3314 - My immense gratitude and gratefulness to them that send their wishes for the 11th .. I cannot possibly thank each one individually .. but each one of you reside in my heart .. my love to you ..🙏☘🌹💗⚘ .. अनेक अनेक धन्यवाद 🌻
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 10, 2019