भारतीय क्रिकेट टीम मधला धडाडीचा फलंदाज युवराज सिंग याचा उद्या म्हणजेच १२ डिसेंबर रोजी जन्मदिवस आहे. प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने काही ना काही संकल्प करत असतात. त्याचप्रमाणे युवीनेही आपली इच्छा, अपेक्षा किंवा संकल्प सोशल मीडियावरून बोलून दाखवला आहे. 'मी माझ्या वाढदिवसासाठी 'सिक्स पॅक' करण्याचा प्रयत्न करीत आहे, मला वाटतय तो दिवस उद्याच आहे; तुमचं काय मत आहे..?'' या आशयाची पोस्ट युवीने फेसबुकवर केलेली आहे.
युवीच्या या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्याच्या चाहत्यांनी त्याला आजपासूनच जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्याच्या चाहत्यांपैकीच्या काही प्रतिक्रिया मात्र लक्षवेधी आहे. कोणी म्हणताय युवी तू लवकर भारतीय संघात परत ये, आम्हाला तुला खेळताना बघायचंय. तर कोणी म्हणताय युवी आज पर्यंत तू सिक्सर किंग होतास उद्या पासून तू 'सिक्स पॅक' किंग होशील...
या पोस्ट शिवाय विराट-अनुष्काच्या लग्नाचं केवळ युवी व सचिनला आमंत्रण आल्याच्या वृत्तामुळेदेखील युवी गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात यापूर्वी जसप्रीत बुमराह, शिखर धवन व मोहंमद कैफ या खेळाडूंचे वाढदिवस झाले आहेत. आता उद्या युवीचा वाढदिवस कसा साजरा होतो आणि त्याचे चाहते त्याला कशा प्रकारे सरप्राईस देतात हे पाहणं औसुक्याच ठरेल.