क्रिकेटचा देव म्हणून मानला जाणारा महाराष्ट्राचा आणि देशाचा लाडका खेळाडू सचिन तेंडूलकर अर्थात ‘तेड्ल्या’ याचा आज ४५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर ‘हॅपी बर्थडे सचिन’ असा ट्रेंड सुरु असून सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आज सकाळपासून सचिनच्या घरापुढे त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या सचिनची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.
सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव....
आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन आपल्या चाहत्यांसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहे. ही माहिती सचिनने स्वत: ट्वीटरवरून दिली आहे.