‘कोरोना’ विरुद्ध ‘हॅप्पीवाली फीलिंग’नाबाद अकरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020
Total Views |


Happywali Feeling_1 

 

 


 


कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे माणसांच्या आश्रमांना भेटी थांबल्याने तिथे मिळणारी मदतदेखील कमी येऊ लागली. तरी आश्रमातील चिमुकल्यांना आणि वृद्धांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी चाललेल्या धडपडीला यश येऊन गेल्या तीन महिन्यांमध्ये टीम ‘हॅप्पीवाली फीलिंग’च्या माध्यमातून एकंदरीत अकरा आश्रमांमध्ये अन्नधान्याच्या साधन सामग्री वाटप पार पाडले गेले.

 
 
कोरोना रोगाने जगभरात सगळीकडेच थैमान माजवून जनसामान्यांचे जीवन हे अगदीच विस्कळीत केलेले आहे. याचा प्रभाव समाजात सर्व स्तरांतील लोकांवर, उद्योगधंद्यावर, रोजगारांवर तसेच संस्थांवर होतं असल्याचे चित्र कमी-अधिक फरकाने आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मग त्यात अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम यांसारख्य्या अनेक सामाजिक संस्थांनादेखील या परिस्थितीत असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आश्रमांमध्ये होणार्‍या भेटी पूर्णतः बंद असल्यामुळे त्या भेटींमधून जमा होणारी मदतदेखील काही प्रमाणात कमी, किंबहुना बंद झालेली आहे आणि आश्रमांना सदस्य संगोपनामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अशाच एकूण ११ गरजू आश्रमांपर्यंत अन्नधान्याची मदत पोहोचवण्याचे कार्य ‘हॅप्पीवालीफीलिंग’ने केलेले असून या कार्यात ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’(घाटकोपर) ‘आयुष ग्रुप’ (डोंबिवली) आणि ‘कल्याण युवा मंच’ या संस्थांचे बहुमोल योगदान लाभले.
 
 
बदलापूर कल्याण भागातील साधन सामग्री वाटप मोहिमेत प्रदीप धरणे, पंकज मोरे, चित्रा व्यहवारे, दयानंद जगताप आणि उदय खांडेकर या ‘हॅप्पीवाली फीलिंग’ प्रतिनिधींचा समावेश होता. विशेष उल्लेख करायचे म्हणजे संदीप सुतार, ज्यांच्या वडिलांचे एका महिन्यापूर्वीच आकस्मित निधन झाले, त्यांनी आपले आभाळा एवढे दुःख बाजूला ठेऊन सांगली येथील आश्रमाची मोहीम स्वतः पुढाकार घेऊन बाळा शेडगे सोनोत पार पाडली आणि आश्रमातील आजोबा-आजींच्या गालावर निखळ हसू पसरवले. इथे मदत पोहोचवण्यासाठी सातारा भागातील पाटण तालुका, गावातून बरेचसारे मदतीचे हात पुढे सरसावले. कल्याण येथील ‘चिन्मय पंडित’ (के.वाय.एम.ग्रुप) आणि ‘हॅप्पीवाली फीलिंग’ यांच्या संयुक्त सहभागातून कल्याण येथील विविध भागांमध्ये सातशेहून जास्त गरजूंना तब्ब्ल १४ दिवस जेवण पुरवण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांना पाणी बॉटल, हळद दूध/चहा या गोष्टी पुरवण्यात आल्या. तसेच मुंबई, नवी मुंबई या ठिकाणील गरीब वस्त्यांमधील गरजू मंडळी ज्यांचे हातावर पोट आहे, आणि गेले तीन-चार महिने काहीच उत्पन्न नसल्याने खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत, अशा एकूण १०७ कुटुंबांपर्यंत जीवनाश्यक साधन सामग्री सुपूर्द करण्याचे यश लाभले. त्यात मुंबईतल्या शीव कोळीवाडा भागातील वस्त्यांपासून पनवेल रेल्वे स्थानकालगत असणार्‍या झोपडपट्ट्यांसोबत ठाणे पूलाखाली राहणारी भटकी कुटुंबे अशा ठिकाणांवरील सर्व गरजू कुटुंबांचा समावेश आहे.

 

 


आता तुम्ही विचार कराल नक्की ही मदत येते कुठून? किंवा कशी गोळा केली जाते? तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वाटलेली मदत ही तुम्हा-आम्हांसारख्या जनसामान्य कुटुंबांतूनच गोळा केलेली आहे. जेव्हा कधीही मदतीची गरज भासते तेव्हा ‘हॅप्पीवाली फीलिंग’कडून आवाहन केले जाते आणि त्या प्रतिसादावर गोळा झालेली मदत ही गरजूंकडे सुपूर्द केली जाते. मग आता प्रगत झालेल्या डिजिटल सोशल मीडिया या माध्यमाचा या सगळ्या गोष्टीत लाखमोलाचा उपयोग होतो आहे. जसे की, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, त्याचसोबत फेसबुक पेज या सर्व माध्यमांतून लागणार्‍या मदतीचे वेळोवेळी आवाहन जास्तीत जास्त जनांपर्यंत पोहोचवण्यात यश संपादन होते. सोबतीला ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’, ‘आयुष ग्रुप’, ‘केवायएम ग्रुप’ अशा संस्थांचे वेळोवेळी सहकार्य मिळत गेले. त्यामुळे गोष्टी अधिक सोप्या होत गेल्या आणि म्हणतात ना, ‘भावना एकदा निःस्वार्थ असली की परमेश्वर कोणत्या ना कोणत्या अवताराने पाठीशी उभा राहतो’ आणि माझा तर माणुसकी आणि परमेश्वर या दोन्ही गोष्टींवर दृढ विश्वास आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगावसे वाटते की, ‘हॅप्पीवाली फीलिंग’ हा फक्त समूह किंवा संघटना नाही तर नावाप्रमाणेच ही एक भावना आहे, जी जोडल्या गेलेल्या माणसांबरोबर निःस्वार्थ माणुसकीशी. कोरोनाविरुद्ध लढाई ही अशीच चालू राहील आणि त्यावर एक दिवस विजय नक्कीच भारत संपादन करेल, तोपर्यंत महाराष्ट्रात टीम ‘हॅप्पीवाली फीलिंग’चे मदतकार्य नाबाद असेच चालू राहील आणि मदतकार्याचा आकडा हा निरंतर पुढे सरकत राहील, यामध्ये तीळमात्र शंका नाही.

“एकूण चार आश्रमांपर्यंत अन्नधान्य आम्ही पोहोचवले. ‘हॅप्पीवाली फीलिंग’कडून मदतीचे आवाहन आले की, मदत ही गरजूंपर्यंत पोहोचणारच याची शतप्रतिशत हमी मिळते. कारण, या सर्व तरुण मुलांची तळमळ आणि काम करण्याची पद्धत कौतुकापलीकडील आहे. या पुढेही असेच मदतकार्य निरंतरपणे चालू राहावे आणि निखळ आनंद द्विगुणित होत राहावा, हीच सदिच्छा.

 

 


- डॉ. भावना कुचेरिया
(रश्मीज स्माईल ट्रस्ट)
 

 

 

अन्नधान्य वाटप करण्यात आलेल्या आश्रमांची यादी खालीलप्रमाणे
> स्वामी विवेकानंद आश्रम (ठाणे)
> सत्कर्म बालक आश्रम (बदलापूर)
> नंदादीप आश्रम (कल्याण)
> जाणीव सेवाभावी संस्था (कल्याण)
> आई आश्रम (कल्याण)
> रामकृष्ण हरी वृद्धाश्रम (कोंडेश्वर)
> संगोपिता विकलांग मुलांचे आश्रम (बदलापूर)
> कृष्णराव वृद्धाश्रम (बदलापूर)
> साईधाम आश्रम (खिडकाळी)
> पसायदान आश्रम (कल्याण)
> शिवशंभो वृद्धाश्रम (नेर्ले-सांगली
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@