to bring change in society

मोदीपर्वात मारुतीची निर्मिती, तर लालूंच्या जंगलराजमध्ये मारुतीची लूट! - मतचोरीचे आरोप करणार्यांकडूनच विवाहासाठी चोरीचा ऐवज

शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातमधील हंसलपूर येथे अनेक हरित उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या इ व्हिटारा या गाडीच्या प्लांटचा समावेश आहे. येथे निर्माण होणारी इलेक्ट्रिक वाहने १०० देशांत निर्यात होणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे मोदीपर्वात मारुती गाड्यांच्या निर्मितीला वेग आला आहे, तर लालूंच्या जंगलराजमध्ये याच मारुती गाड्यांची पाटण्यामध्ये लूट करण्यात आली होती.

Read More

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्टपासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Read More

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती.

Read More

एसटीच्या जागेत उभारणार सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर

एसटी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एसटी महामंडळाने सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पद्धतीने विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एसटी महामंडळला उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. शनिवार,दि.२७ जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी मह

Read More

ओडीसी इलेक्ट्रिक वेईकलकडून इलेक्ट्रिक दुचाकी किमतीमध्‍ये कपातीची घोषणा

ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्‍या इलेक्ट्रिक दुचाकींच्‍या संपूर्ण श्रेणीच्‍या किमतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा केली आहे. ग्राहक त्‍वरित प्रत्‍येक मॉडेलवर बचतींचा लाभ घेऊ शकतात, जेथे किमती जवळपास १०,००० रूपयांनी कमी करण्‍यात आल्‍या आहेत. या धोरणात्‍मक पुढाकाराचा इलेक्ट्रिक परिवहनाचे लोकशाहीकरण करण्‍याचा आणि शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या अवलंबतेला गती देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी अधिक लक्षव

Read More

अदानी टोटल एनर्जीची 'एवेरा' बरोबर चार्जिंग हबसाठी व्हिजनरी हातमिळवणी

अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121