अदानी टोटल एनर्जीची 'एवेरा' बरोबर चार्जिंग हबसाठी व्हिजनरी हातमिळवणी
नवी दिल्ली: अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भारतात तयार केली जाईल, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
एटीईएल बी 2 सी आणि बी 2 बी ग्राहकांना सेवा देण्यासाठी चार्जिंग पॉईंट्सच्या विस्तृत श्रेणीसह ईव्ही चार्जिंग इकोसिस्टम स्थापन करणार आहेत. जरी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अद्याप कमी असले तरी वाढत्या मागणीच्या वेळी एव्हारासोबत ईव्हीसाठी भागीदारी झाली आहे. कॅब-हेलिंग सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत्या कलामुळे भारताचे 2030 चे डीकार्बोनायझेशन लक्ष्य साध्य होण्यास मदत होईल, असे देखील निवेदनात म्हटले गेले आहे. एटीईएल आणि एव्हेरा यांना भारतातील सद्यस्थितीत ईव्ही पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्याची आशा असून ज्यामुळे प्रमुख महामार्ग, कामाची ठिकाणे आणि इतर ठिकाणे सोयीस्कर आणि जलद चार्जिंग एसी आणि डीसी सोल्यूशन्ससह लक्ष्य केली जातील.
याविषयी बोलताना 'दिल्ली-एनसीआर क्षेत्रात हा प्रतिष्ठेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी एव्हारासोबत हातमिळवणी करण्यास आम्ही उत्सुक आहोत ,ज्यामुळे आमची दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. दिल्लीतील ओखला येथे क्लस्टर हब चालविण्यासाठी आम्ही एव्हराशी आधीच संलग्न झालो आहोत. आगामी दिल्ली हब आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने ग्राहकांना ग्रीन राइड सुकर करण्यासाठी एव्हराला मदत करेल. या हबमध्ये सुमारे 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स कार्यान्वित केले जातील, जे एसी आणि डीसी चार्जरचे संयोजन असेल," असे एटीजीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पी मंगलानी यांनी सांगितले.
समालखा येथील मोठ्या आकाराचे ईव्ही चार्जिंग स्टेशन इतर एग्रीगेटर्स आणि वैयक्तिक ईव्ही मालकांना क्रॉसयुटिलायझेशन वाढविण्यासाठी आणि नवी दिल्लीतील ईव्ही इकोसिस्टम सुधारण्यासाठी वापरण्यास हिरवा कंदील देण्यात येईल. त्यानंतर हे मॉडेल संपूर्ण भारतात प्रस्थापित केल्यामुळे एटीईएल आणि एव्हेरा हे इन्फ्रास्ट्रक्चर महसूल-सामायिकरण मॉडेलवर सक्षम करतील, जे भागीदारांच्या वैयक्तिक कौशल्याचे समर्थन करून धोरणात्मकदृष्ट्या उपयुक्त ठरते.
एव्हराचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमिष त्रिवेदी म्हणाले की, "ही भागीदारी एव्हेरा कॅब ड्रायव्हर्स तसेच सर्व इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी अधिक अंतराचा प्रवास करण्याची चिंता दूर करून वापरकर्त्यास चांगला अनुभव देईल. हरित, हवामानाविषयी जागरूक आणि शाश्वत अशी गतिशीलता तसेच पायाभूत सुविधा साकारण्याच्या उद्देशाने आम्ही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. भारतातील ईव्ही पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी एटीईएलबरोबर सैन्य एकत्र करण्यास आम्ही व्यक्ती, व्यवसाय आणि कॅब एग्रीगेटर्समध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करू' असू म्हणाले.
राजधानीतील आगामी चार्जिंग स्टेशनमुळे रेंजची चिंता तर दूर होईलच, शिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यासही प्रोत्साहन मिळेल,असे संयुक्त विद्यमानाने उपक्रम किती ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत असले तरी नक्की किती स्टेशन याबाबत खुलासा अजून केला गेला नाही.