Popular Vechiles and Services IPO Update -
मुंबई: आज ऑटोमोबाईल डिलर कंपनी पॉप्युलर व्हेईकल व सर्विसेस कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी दाखल झाला होता. मात्र आयपीओ झाल्यावर ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या आयपीओला ठीकठाक प्रतिसाद मिळाला होता. लिस्टिंग (नोंदणीकृत) होताना कंपनीच्या समभागांची (शेअर) चे २ टक्के सवलतीने विक्री होत असल्याचा दावा शेअर बाजारात केला गेला आहे.
एनएससी (NSE) वर २८९.२० व बीएससीवर (BSE) वर २९२ रूपयावर हा समभाग अखेरच्या सत्रात काल बंद झाला आहे. म्हणजेच बीएससीवर १ टक्क्याने व एनएससीवर १.८७ टक्क्याने हा समभाग ग्रे मार्केटमध्ये घटला आहे. ही केरळस्थित कंपनीची आर्थिक कामगिरी चांगल्या पद्धतीची असली तरीदेखील कंपनीच्या काही सर्विसेसबददल मत मतांतरे असल्याने याचा बाजारात परिणाम जाणवला आहे.
कंपनीचा आयपीओ शेवटच्या दिवशी संपूर्ण सबस्क्राईब झाला होता.शेवटच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रापर्यंत १.१८ वेळा आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. १.४४ कोटींच्या बदल्यात १.६९ कोटींचे बिडिंग कंपनीला प्राप्त झाले आहे.कंपनीचे (QIP) पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी १.८५ वेळा सबस्क्रिप्शनसाठी बिडिंग केले आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ केवळ ६५ टक्के सबस्क्राईब झाल्याचा अहवाल प्रसारमाध्यमांनी दिला आहे.
कंपनीने २५० कोटी रुपयांचे इक्विटी समभाग हे कंपनीकडून इश्यू करण्यात आले होते. संस्थापक (Promoter) यांच्याकडे जॉन पॉल, फ्रान्सिस पॉल, नवीन फिलीप यांच्याकडे एकूण ६९.४५ % भागभांडवल आहे.कंपनीकडून सांगण्यात आल्याप्रमाणे आयपीओतून मिळालेल्या निधीचा विनियोग थकीत देय चुकवण्यासाठी व भविष्यातील तरतूदीसाठी केला जाणार आहे.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या उलाढालीतून मिळालेला महसूल ४१ टक्क्याने ईयर ऑन ईयर बेसिसवर (YoY) वर ४१ टक्क्याने वाढला होता. निव्वळ नफा ९१ टक्क्याने वाढत ६४ कोटीवर वाढला होता.