आयपीओ बातमी: पॉप्युलर व्हेईकलचा आयपीओ आजपासून बाजारात

प्राईज बँड २८० ते २९५ रूपये प्रति इक्विटी प्रति इक्विटी

    12-Mar-2024
Total Views | 50

IPO
 
 
मुंबई: ऑटोमोबाईल सेक्टरमधील कंपनी पॉप्युलर व्हेईकलचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ (IPO) हा १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहे.१२ मार्च ते १४ मार्च या काळात आयपीओची मुदत आहे.कंपनीतर्फे या आयपीओ मार्फत ६०२ कोटी रूपयांचा निधी जमा केला जाणार आहे. कंपनीकडून गुंतवणूकीसाठी प्राईज बँड(Price Band) किंमत २८० ते २९५ रूपये प्रति इक्विटी समभाग(शेअर) इतका ठरवण्यात आलेल्या आहे.
 
गेले काही वर्षात ऑटोमोबाईल व्यवसायात मोठी तेजी पहायला मिळाली होती. सध्याच्या घडीला एकूण जीडीपीपैकी ७ टक्के जीडीपी वाटा हा ऑटोमोबाईल क्षेत्राचाआहे.या तिमाहीत अनेक दुचाकी चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या धर्तीवर पॉप्युलर व्हेईकलचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे.
 
कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, केरळस्थित पॉप्युलर व्हेईकलने अँकर गुंतवणूकदारांना (खाजगी गुंतवणूकदारांना) कंपनीने ६१०७३२५ शेअर २९५ रूपये प्रति इक्विटी या दराने देऊ केले आहेत. कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५० कोटी मूल्यांचे इक्विटी समभाग बाजारात आणले आहेत.कंपनीकडून ऑफर फॉर सेल (OFS) साठी १.१९ कोटी इक्विटी समभाग हे प्रायव्हेट इक्विटी फंड बनयान ट्री कॅपिटल ही २, एल आय सी यांच्यामार्फत उपलब्ध करून विकले जाणार आहेत.
 
कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण निधीतील १९२ कोटी रुपयांचा विनिमय थकबाकी देयक,व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.आज दुपारपर्यंत कंपनीच्या समभागांची बिडिंग ०.१८ वेळा झाली होती.
 
कंपनीकडून १५ तारखेपर्यंत या सहभागाचे वाटप करण्यात येणार आहे. १९ तारखेपासून बीएससी एनएससीवर या समभागांचे लिस्टिंग होणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121