तीनचाकी वाहनांच्या व्हॉल्युममध्ये मोठी वाढ - अहवाल

क्रिसिल अहवालानुसार २०२४ मध्ये ४० ते ४२ टक्क्याने वाढ होण्याची शक्यता

    19-Mar-2024
Total Views | 38
 
Three wheeler
 
 
मुंबई: तीनचाकी वाहनांच्या व्हॉल्युममध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या क्रिसिल रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. देशांतर्गत तीनचाकी वाहनांच्या या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४० ते ४२ टक्क्याने तीनचाकी वाहनांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. २०१९ या आर्थिक वर्षी ही वाढ १२ टक्क्याने होत ७ लाख युनिट्सपर्यंत वाढला झाली होती. क्रिसिल अहवालानुसार यंदा ती वाढ ७ लाखांवरून ७.८ लाख युनिट्स पर्यंत वाढ होऊ शकते.
 
इलेक्ट्रिक व इंटर्नल कमबशन इंजिन (Internal Combustion Engine) मधील वाढलेल्या मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे व्हॉल्युममध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मुख्यतः प्रवासी वाहतूकीच्या दळणवळणासाठी, तसेच ई कॉमर्स, रिटेल,टेक्साटाईल, डिलिव्हरी सर्विसेस यातील वाढीव मागणीमुळे ही वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तीनचाकीपैकी मोठ्या प्रमाणात युनिट्सची निर्यात केली जाते.
 
अहवालातील निष्कर्षाप्रमाणे यातील अहवाल ९० टक्के तीनचाकी वाहनांच्या माहितीच्या आधारे काढण्यात आलेला आहे. यामधील ८६ टक्के वाटा आयसीई (ICE) वाहनांचा आहे.आर्थिक वर्ष २०२१ मधील कोविडकाळात उत्पादन हे घटले होते. हे तब्बल ७० टक्क्याने घटल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या व्हॉल्युममध्ये मोठी वाढ होऊ शकते.
 
या अहवालातबदल बोलताना, क्रिसिलच्या संचालक पुनम उपाध्याय म्हणाल्या, 'संपूर्ण भारतभर CNG नेटवर्कच्या वाढीमुळे, आर्थिक वर्ष २०२५ मधील वाढीव मागणीपैकी अर्धी मागणी पारंपारिक ICE प्रकारांसाठी असेल,विशेषत: 3Ws संकुचित नैसर्गिक वायू (CNG) द्वारे समर्थित शिल्लक वाढीव मागणी इलेक्ट्रिक 3Ws मधून येईल, ज्यात नोंदणी शुल्क आणि रोड परमिट आवश्यकता कमी/माफ करणे यासह मालकी आणि आर्थिक प्रोत्साहने यांच्या कमी किमतीमुळे त्यांचे प्रमाण वर्षभरात ५०% वाढत असल्याचे दिसून आले.EVs एकूण व्हॉल्यूममध्ये त्यांचा वाटा पुढील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अंदाजे ~१४ % वरून १९-२०% पर्यंत नेतील. कमी चालवण्याचा खर्च CNG-चालित 3W च्या तुलनेत इलेक्ट्रिक ३Ws ~३०% ने किफायतशीर बनवतो.'
 
देशांतर्गत मागणी वाढली तरी जागतिक महागाईत आंतरराष्ट्रीय बाजारात त्यामानाने मागणी घटली होती. विशेषत: ही मागणी आफ्रिका, श्रीलंका बांगलादेश या देशातील कमी झाली आहे.
 
अहवालावर प्रतिक्रिया देताना क्रिसिलचे संचालक अनिल मोरे म्हणाले, 'उत्कृष्ट रोख निर्मिती मूळ उपकरणे निर्मात्यांद्वारे भांडवली खर्च पूर्ण करण्यासाठी पुरेशी असेल, ज्यामुळे भौतिक कर्ज जोडण्याची गरज दूर होईल. त्यामुळे, या आर्थिक वर्षात आणि पुढील काळात व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीचे प्रमाण अनुक्रमे ५५-६० पट आणि ०.२० -०.३० वेळा मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.'
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121